'कपल चॅलेंज'च्या ट्रेंडला बळी कशाला पडताय ?कुटुंब उद्ध्वस्त करू नका : अनेकांना धोका , सायबर गुन्हेगारांना मिळतेय संधी,

'कपल चॅलेंज'च्या ट्रेंडला बळी कशाला पडताय ?

कुटुंब उद्ध्वस्त करू नका : अनेकांना धोका ,

 सायबर गुन्हेगारांना मिळतेय संधी,

कपल चॅलेंज , फैमिली चॅलेंज , सिंगल चॅलेंज , असे वेगवेगळे चॅलेंज स्वीकारून स्वत : चे व आपल्या कुटुंबीयांचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करीत असाल , तर सावधान ! तुम्ही स्वतः अपलोड केलेल्या या फोटोचा सायबर गुन्हेगार गैरवापर करून तुमच्या सुखी संसारात आग लावू शकतात . होय , अशा अनेक घटना देशभरात यापूर्वी घडल्या असून आता या ट्रेंडला बळी पडणाऱ्यांचे धोके वाढले आहेत .

असा आहे ट्रेंड •
 गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर वेगवेगळ्या चॅलेंजच्या नावाखाली स्वत : चे व आपल्या परिवाराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याचा ट्रेंड सुरु झाला आहे . त्याला बळी पडून अनेक जण पत्नीसोबतचे फोटो अपलोड करीत आहेत . कुणी नववारीत तर कुणी सूटमध्ये कुणी पारंपरिक तर कुणी पाचात्य परिधान करुन हे चॅलेंज स्वीकारण्याच्या नादात अनेक जण धोक्याला आमंत्रण देत आहेत .

असा होईल धोका • 
कपल चॅलेंज नावाने सर्च केले असता हजारो दाम्पत्यांचे फोटो त्यांना सहज उपलब्ध होत आहेत . couplechallenge कारण त्याला तो हॅशटॅग दिला गेला आहे . विकृत गुन्हेगार एका महिलेच्या ठिकाणी दुसऱ्या महिलेचे मार्फ ( एडिट ) करुन ते अश्लील छायाचित्र नातेवाईकांना किंवा मित्रपरिवारांना पाठवून संबंधित महिलेचे कौटुंबिक आयुष्य उद्ध्वस्त करु शकतात . तिला ब्लॅकमेल केले जाऊ शकते .

पोलिसांकडे तक्रार करा . अशा प्रकारचे अनेक गैरप्रकार यापूर्वी ठिकाणी घडले आहेत . त्यामुळे नागरिकांनी वेळीच सावध होऊन अशा कोणत्याही चॅलेंजच्या नादात आपले अथवा पत्नीचे , मुलींचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करु नये , असे पोलिसांनी आवाहन केले आहे . ज्यांनी फोटो अपलोड केले आणि कुणाला सायबर गुन्हेगार ब्लॅकमेल करत असेल तर त्यांनी लगेच नजीकच्या पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवावी , असे आवाहन पोलिसांनी केले आहे .