महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष नाना पटोले ला कोरोना ची लागान #MaharashtraNanaPatole

नागपूर , 04 सेप्टेंबर (का प्र) : महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रकोप थांबण्याचे नाव घेत नाहीये . दिवसेंदिवस कोरोनाबंधितांचा आकडा वाढतच चालला आहे . मृत्यूंचे प्रमाणही वाढत आहे. अशातच महाराष्ट्रात (विदर्भ) सध्या पुराचे संकटही आले आहे. विदर्भातील पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी स्वतःच्या मतदारसंघात असताना महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. नाना पटोले यांनी स्वतः ट्विटरवरून यासंदर्भात माहिती दिली आहे .