चंद्रपूर शहर व परीसरातील 121, 24 तासात 272 बाधित आले पुढे; 5 बाधितांचा मृत्यू, चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या 10514 #CoronaChandrapur

चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत 6190 कोरोना मुक्त

जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या 10514

उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या 4167

24 तासात 272 बाधित आले पुढे; 5 बाधितांचा मृत्यू

चंद्रपूर, दि. 1 ऑक्टोंबर : चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात 272 बाधित पुढे आलेले असून एकूण बाधितांची संख्या आता 10 हजार 514 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 6 हजार 190 कोरोना बाधित उपचाराअंती बरे झालेले असून त्यांना सुटी देण्यात आली आहे. सध्या उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या 4 हजार 167 आहे.

आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, 24 तासात पाच बाधितांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये, विवेकानंद नगर, चंद्रपुर येथील 75 वर्षीय पुरुष बाधिताचा समावेश आहे. या बाधिताला 18 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

दुसरा मृत्यू महाकाली कॉलरी, चंद्रपुर येथील 61 वर्षीय महिला बाधितेचा झाला आहे. या बाधितेला 30 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

तिसरा मृत्यू भिसी, चिमूर येथील 45 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 27 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

चवथा मृत्यू उत्तम नगर, चंद्रपुर येथील 57 वर्षीय महिला बाधितेचा झाला आहे. या बाधितेला 22 सप्टेंबरला कोलसिटी हॉस्पिटल चंद्रपूर येथे भरती करण्यात आले होते.

तर, पाचवा मृत्यू जीएमसी परिसर, चंद्रपूर येथील 80 वर्षीय महिला बाधितेचा झाला आहे. या बाधितेला 27 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. 

पहिल्या व दुसऱ्या बाधिताला कोरोनासह न्युमोनियाचा आजार होता, तिसऱ्या बाधिताला कोरोनासह श्वसनाचा आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथे मृत्यू झालेला आहे. चवथ्या बाधिताला कोरोनासह मधुमेह व श्वसनाचा आजार असल्याने कोलसिटी हॉस्पिटल चंद्रपूर येथे मृत्यू झालेला आहे. तर, पाचव्या बाधिताला कोरोनासह हृदय विकार, न्युमोनिया, उच्चरक्तदाब असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथे मृत्यू झालेला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 157 कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यापैकी, चंद्रपूर 148, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली तीन, यवतमाळ तीन तर भंडारा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये 

चंद्रपूर शहर व परीसरातील 121, 
बल्लारपूर तालुक्यातील 16, 
चिमूर तालुक्यातील 8, 
मुल तालुक्यातील 23, 
गोंडपिपरी तालुक्यातील 2,
 कोरपना तालुक्यातील 10,
 ब्रह्मपुरी तालुक्यातील 10,  
नागभीड तालुक्‍यातील 15, 
वरोरा तालुक्यातील 20, 
भद्रावती तालुक्यातील 13, 
सावली तालुक्यातील 6, 
सिंदेवाही तालुक्यातील 18, 
राजुरा तालुक्यातील 7,
 गडचिरोली येथील एक तर वणी -यवतमाळ येथील दोन 
असे एकूण 272  बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहर व परिसरातील
 जल नगर वार्ड, 
रामनगर वार्ड, 
अंचलेश्वर गेट परिसर, 
शास्त्रीनगर, 
भिवापूर, 
सुमित्रा नगर तुकूम, 
बाबुपेठ, 
संजय नगर,
 बाजार वार्ड, 
पठाणपुरा वार्ड, 
नगीना बाग, 
इंदिरानगर, 
ऊर्जानगर, 
लालपेठ, 
बालाजी वार्ड, 
विठ्ठल मंदिर वार्ड, 
विवेकानंद नगर, 
दाताळा, 
जगन्नाथ बाबा नगर,
 हनुमान वार्ड
 भागातून  पॉझिटीव्ह ठरले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:

बल्लारपूर तालुक्यातील गणपती वार्ड, गौरक्षण वार्ड, टिळक वार्ड, रवींद्र नगर परिसरातून बाधित पुढे आले आहे. 

राजुरा तालुक्यातील जवाहर नगर राजुरा, फॉरेस्ट कॉलनी परिसर, पेठ वार्ड, रामनगर, धोपटाळा, चुनाभट्टी भागातून बाधित ठरले आहे.

वरोरा तालुक्यातील सुमठाणा, आझाद वार्ड, कमला नेहरू वार्ड, मालवीय वार्ड, केशवनगर, इंद्रप्रस्थ नगर, सरदार पटेल वार्ड परिसरातून बाधित पुढे आले आहे.

 ब्रह्मपुरी तालुक्यातील जानी वार्ड, ओम नगर, पटेल नगर, संत रविदास चौक परिसर, झाशी राणी चौक परिसरातून बाधित ठरले आहे.

भद्रावती तालुक्यातील जुना सुमठाणा, गौतम नगर, गुरु नगर, मंजुषा लेआउट परिसर, सूर्य मंदिर वार्ड, एकता नगर, चारगाव कॉलनी परिसरातून बाधित पुढे आले आहे. 

नागभीड तालुक्यातील गोवर्धन चौक, मिंथुर, सावरगाव, मेंढा परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. 

चिमूर तालुक्यातील मोठेगाव, नूतन आदर्श कॉलनी परिसर, टिळक वार्ड, वडाळा पैकु, शंकरपुर भागातून बाधित ठरले आहे.

कोरपना तालुक्यातील गडचांदूर, आवारपुर, पंचशील वार्ड भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे. 

सिंदेवाही तालुक्यातील पळसगाव, लोनवाही, नवरगाव, गुंजेवाही भागातून बाधित पुढे आले आहे. 

गोंडपिपरी तालुक्यातील करंजी, कुडे सावली, परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. मुल तालुक्यातील आकापुर, विवेक नगर, वार्ड नंबर 17 भागातून बाधित पुढे आले आहे.