मागील 24 तासात चंद्रपूर जिल्ह्यात 02 कोरोना बाधितांचा मृत्यु, corona

चंद्रपूर, 15 ऑक्टोबर : पहिला मृत्यू : रामपुर , राजुरा येथील 80 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 7 ऑक्टोबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते .

 दुसरा मृत्यू : समाधी वार्ड , चंद्रपूर येथील 82 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 9 ऑक्टोबरला श्वेता हॉस्पिटल , चंद्रपूर येथे भरती करण्यात आले होते .

 ( गेल्या 24 तासातील हे वरील दोन मृत्यू आहेत . पहिल्या बाधिताला कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे . 

दुसऱ्या बाधिताला कोरोनासह उच्च रक्तदाब , मधुमेहाचा आजार असल्याने श्वेता हॉस्पिटल , चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे . )
 ( चंद्रपूर 186 , तेलंगाणा 01 , बुलडाणा 01 , गडचिरोली 03 , यवतमाळ 03 , आणि भंडारा 01 )