मागील 24 तासात चंद्रपूर जिल्ह्यात 03 कोरोना बाधितांचा मृत्यु, एकूण मृत्यु 184 (जिल्ह्यातील 175) Corona

पहिला मृत्यू : सावली येथील 52 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 7 ऑक्टोबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते .

 दुसरा मृत्यू : भानापेठ वाई , चंद्रपुर येथील 69 वर्षीय महिला बाधितेचा मृत्यू झाला आहे . या बाधितेला 10 ऑक्टोबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते . 

तिसरा मृत्यू : सौगत नगर तुकुम , चंद्रपुर येथील 59 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 5 ऑक्टोबरला मानवटकर हॉस्पीटल , चंद्रपूर येथे भरती करण्यात आले होते . 

( गेल्या 24 तासातील हे वरील तीन मृत्यू आहेत . पहिल्या व दुसऱ्या बाधिताला कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे . तर , तिसऱ्या बाधिताला कोरोनासह श्वसनाचा आजार असल्याने मानवटकर हॉस्पीटल , चंद्रपूर येथे मृत्यू झाला आहे . )

आतापर्यंत मृत्यू झालेले बाधित 184 ( चंद्रपूर 175 , तेलंगाणा 01 , बुलडाणा 01 , गडचिरोली 03 , यवतमाळ 03 , आणि भंडारा 01 ).