चंद्रपूर जिल्ह्यात आनंदाची बातमी दोन महिन्यानंतर प्रथमच चोवीस तासात एकही मृत्यू नाही, मागील 24 तासात 141 नवीन कोरोना बाधितांची नोंद corona

चंद्रपूर, 08 ऑक्टोबर (का प्र): 
चंद्रपूर जिल्ह्यात  आनंदाची बातमी ही आहे की मागील दोन महिन्यानंतर प्रथमच चोवीस (24) तासात एकही मृत्यू नाही.

 मागील 48 तासात (बुधवार ते शुक्रवार) चंद्रपूर जिल्ह्यातील 171 सह एकूण 180 कोरोना बाधिताचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 11764 झाली आहे. गेल्या 24 तासात 141 नवीन बाधित पुढे आले आहेत.

आतापर्यंत 8436  बाधितांना कोरोनातून मुक्त झाल्यामुळे सुटी देण्यात आली आहे.

सध्या जिल्ह्यामध्ये 3148 बाधित उपचार घेत आहे.