मागील 24 तासात चंद्रपूर जिल्ह्यात 5 कोरोना बाधितांचा मृत्यु ,एकूण मृत्यु 157 (जिल्ह्यातील 148) corona

चंद्रपूर, 01 ऑक्टोबर (का प्र) :पहिला मृत्यू : विवेकानंद नगर , चंद्रपुर येथील 75 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 18 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते . 

दुसरा मृत्यू : महाकाली कॉलरी , चंद्रपुर येथील 61 वर्षीय महिला बाधितेचा मृत्यू झाला आहे . या बाधितेला 30 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते . 

तिसरा मृत्यू : भिसी , चिमूर येथील 45 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 27 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते .

 चवथा मृत्यू : उत्तम नगर , चंद्रपुर येथील 57 वर्षीय महिला बाधितेचा मृत्यू झाला आहे . या बाधितेला 22 सप्टेंबरला कोलसिटी हॉस्पिटल चंद्रपूर येथे भरती करण्यात आले होते .

 पाचवा मृत्यू : जीएमसी परिसर , चंद्रपूर येथील 80 वर्षीय महिला बाधितेचा मृत्यू झाला आहे . या बाधितेला 27 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते . 

( गेल्या 24 तासातील हे वरील पाच मृत्यू आहेत . अनुक्रमे पहिला व दुसऱ्या बाधिताला कोरोनासह न्युमोनियाचा आजार होता , 

तिसऱ्या बाधिताला कोरोनासह श्वसनाचा आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथे मृत्यू झालेला आहे .

 चवथ्या बाधिताला कोरोनासह मधुमेह व श्वसनाचा आजार असल्याने कोलसिटी हॉस्पिटल चंद्रपूर येथे मृत्यू झालेला आहे . तर , 

पाचव्या बाधिताला कोरोनासह हृदय विकार , न्युमोनिया , उच्चरक्तदाब असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथे मृत्यू झालेला आहे . ).

आतापर्यंत बरे झालेले बाधित आतापर्यंत मृत्यू झालेले बाधित 157 ( चंद्रपूर 148 , तेलंगाणा 01 , बुलडाणा 01 , गडचिरोली 03 , यवतमाळ 03 , भंडारा 01).