मागील 24 तासात 89 नवीन कोरोना बाधितांची नोंद Corona

चंद्रपूर ,26 ऑक्टोबर :
चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 26 ऑक्टोबर रोजी 14861 झाली आहे. 

गेल्या 24 तासात 89 नवीन बाधित पुढे आले आहेत.

चंद्रपुर जिल्ह्यात आत्तापर्यंत 11860 बाधितांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे.

कोरोना संदर्भात मोठ्या प्रमाणात चाचण्या जिल्ह्यांमध्ये सुरू असून नागरिकांनी पुढे येऊन स्वतःच्या चाचण्या करून घेण्याचे आवाहन देखील जिल्हा प्रशासनाने केले आहे.

 सध्या जिल्ह्यामध्ये 2779 बाधित उपचार घेत आहे.आतापर्यंत 11860 बाधितांना कोरोनातून मुक्त झाल्यामुळे सुटी देण्यात आली आहे. 

चंद्रपूर जिल्ह्यातील 209 सह एकूण 222 कोरोना बाधिताचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.