चंद्रपूर शहर व परिसरातील 80, 24 तासात 156 नवीन बाधित; 3 बाधितांचा मृत्यू, जिल्ह्यातील बाधितांची संख्या आता 12233 #Corona

चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत 8977 बाधित कोरोनातून झाले बरे

उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या 3069

जिल्ह्यातील बाधितांची संख्या आता 12233 वर

24 तासात 156 नवीन बाधित; 3 बाधितांचा मृत्यू

चंद्रपूर, दि. 12 ऑक्टोंबर : जिल्ह्यात गेल्या 24 तासात 156 नवीन बाधितांची भर पडली असून बाधितांची एकूण संख्या 12 हजार 233 वर गेली आहे. आतापर्यंत 8 हजार 977 बाधित कोरोनातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. तर सध्या 3 हजार 69 बाधितांवर उपचार सुरू आहे.

आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, 24 तासात तीन बाधितांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये, संतोषी माता वार्ड, बल्लारपूर येथील 65 वर्षीय पुरुष बाधिताचा समावेश आहे. या बाधिताला 4 ऑक्टोबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

दुसरा मृत्यू बाबुपेठ, चंद्रपुर येथील 56 वर्षीय पुरुष बाधिताचा  झाला आहे. या बाधिताला 24 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

तर, तिसरा मृत्यू शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय परीसर, चंद्रपुर येथील 59 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 4  ऑक्टोबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. 

तीनही बाधितांना कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 187 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 178, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली तीन, यवतमाळ तीन आणि भंडारा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये 

चंद्रपूर शहर व परिसरातील 80, 
पोंभूर्णा तालुक्यातील 2,
 बल्लारपूर तालुक्यातील 2, 
चिमूर तालुक्यातील 13, 
मुल तालुक्यातील 10, 
कोरपना तालुक्यातील 1, 
ब्रह्मपुरी तालुक्यातील 23, 
नागभीड तालुक्यातील 5,
  वरोरा तालुक्यातील 3, 
भद्रावती तालुक्यातील 3,
सिंदेवाही तालुक्यातील 11, 
यवतमाळ 1 तर 
गडचिरोली येथील 2 
असे एकूण 156 बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहर व परिसरातील 
अंचलेश्वर वॉर्ड, 
राम नगर, 
घुटकाळा वार्ड, 
नगीना बाग, 
वडगाव,
भानापेठ वार्ड, 
दादमहल, 
फुटाळा, 
ऊर्जानगर, 
पडोली, 
बाबुपेठ,
 बंगाली कॅम्प परिसर, 
एकोरी वार्ड,
 जटपुरा गेट परिसर, 
सरकार नगर, 
बागला नगर, 
सिस्टर कॉलनी परिसर, 
भिवापुर, 
कृष्णा नगर,
शिवाजीनगर घुग्घुस,
 विवेक नगर, 
अशोक नगर, 
रयतवारी कॉलरी परिसर, 
सुमित्रा नगर, 
बापट नगर, 
मित्र नगर 
भागातून पॉझिटीव्ह पुढे आले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:

बल्लारपूर तालुक्यातील मानोरा, गिलबिली परिसरातून बाधित पुढे आले आहे.

 वरोरा तालुक्यातील आंबेडकर चौक परिसर, आनंदवन परिसरातून बाधित ठरले आहे. 

ब्रह्मपुरी तालुक्यातील मालडोंगरी, कुरझा, देलनवाडी, शेष नगर,खेड, श्री नगर , पेठ वार्ड,भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे. 

भद्रावती तालुक्यातील शिवाजीनगर परिसरातून बाधित पुढे आले आहे. 

सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव, पळसगाव, लोनवाही, कोसबी, वासेरा, जीवनापूर, देवाडा परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

नागभीड तालुक्यातील ओवळा, गांधी चौक गिरगाव भागातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे.

 मुल तालुक्यातील आंबेडकर वार्ड, चिरोली, जूनासुर्ला परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. 

कोरपना तालुक्यातील गडचांदूर भागातून बाधित पुढे आले आहे. 

चिमूर तालुक्यातील गुरुदेव वार्ड, मदनापूर, जांभुळ घाट,भिसी,परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.