पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांना कर्नाटक पाॅवर कार्पोरेशन लिमी. प्रकल्पग्रस्तांचे निवेदन , प्रथम पूनर्वसन, स्थायी नौकरी नंतरच कोळसा खान सुरू होवू देणार #KarnatakPowerCorporation #HansrajAhir

पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांना कर्नाटक पाॅवर कार्पोरेशन लिमी. प्रकल्पग्रस्तांचे निवेदन

प्रथम पूनर्वसन, स्थायी नौकरी नंतरच कोळसा खान सुरू होवू देणार

चंद्रपूर:- कर्नाटक पाॅवर कार्पोरेशन लिमी. व्दारा बरांज ता. भद्रावती येथील खुली कोळसा खदान दि. 31 मार्च 2015 पासून बेद आहे. ही खान पूर्वरत सुरू करण्याच्या हालचाली खान प्रशासनाकडुन सुरू आहेत. या प्रकल्पातील प्रकल्पग्रस्त बरांज (मोकासा) व चेक बरांज या गावांचे पुनर्वसन, प्रकल्पग्रस्त व ईतर कामगारांच्या स्थायी नौकरीचा विषय तसेच इतर समस्या अद्यापपावेतो ज्ञच्ब्स् नी मार्गी लावलेल्या नाहीत. 
यासंदर्भात आज बरांज (मोकासा) व चेक बरांज येथील प्रकल्पग्रस्तांनी शासकीय विश्रामगृह भद्रावती येथे पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांचे प्रमुख उपस्थितीत बैठकीचे आयोजन केले होते व प्रकल्पग्रस्तांमार्फत त्यांना निवेदन देण्यात आले. 

प्रकल्पग्रस्तांच्या मताशी मी सहमत असुन केंद्र सरकारच्या धोरणानुसार प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावू व राज्य सरकारने प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नावर  लक्ष घालावे. लवकरच जिल्हाधिकारी, केपीसीएल अधिकारी यांचे सोबत बैठकीचे आयोजन करू असे यावेळी अहीर यांनी सांगीतले.  
याप्रसंगी बोलतांना हंसराज अहीर म्हणाले की पुनर्वसन तसेच प्रकल्पग्रस्त व स्थानीक कामगार यांना KPCL  चे कामगार म्हणुन स्थायी नौकरी शिवाय कोळसा खान सुरू होवू देणार नाही.   

केंद्र शासनाच्या नवीन कायद्यानूसार कामगार हा ज्ञच्ब्स् चा कर्मचारी असनार असेही अहीर म्हणाले, प्रकल्पग्रस्तांनी त्यांचे थकीत वेतन, उर्वरीत शेतजमीन भुसंपादन करने, 50 टक्के शेतजमीन परत करण्याच्या कराराची अंमलबजावनी करने. 
यावर ही अहीर यांचेसोबत चर्चा केली व समस्यांचे निवेदन दिले. यावेळी श्री नरेंद्र जिवतोडे, विजय वानखेडे, पं.स. सभापती प्रविन ठेंगने, प्रशांत डाखरे, प्रविन सातपुते, किशोर गोवारदीपे, तसेच प्रकल्पग्रस्त संजय ढाकने, राजेंद्र डोंगे, रामदास मत्ते, दिनेश वानखेडे, राजगोपाल जयरामन, प्रभाकर कुळमेथे, विठोबा सालुरकर, प्रमोद काथवटे, संतोष बुगुल, संदीप खोब्रागडे, संदीप निमकर, शेषराव मासीरकर, हरीचंद्र आसुटकर, बंडुजी बोढाने, गुणवंत दैवलकर, प्रविन बोढानेव इतर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची  उपस्थिती होती.