आमदार प्रतिभाताई धानोरकरांची शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांना मागणी
चंद्रपूर : कोविड १९ संसर्ग आजारामुळे कर्तव्य बजावतांना मृत्यू झालेल्या शिक्षकांना विमा कवच रक्कम देण्याची मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्याकडे केली आहे. आज मंत्रालयात भेट घेऊन याबाबतचे निवेदन दिले.
शिक्षकांनी कोरोना प्रतिबंधित क्षेत्रात तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत झालेल्या सर्वेक्षणामध्ये कर्तव्य बजावले आहे. या काळात अनेक शिक्षकांना कोरोनाची बाधा होऊन मृत्यू झालेले आहे. असे असतांना संदर्भीय पत्रामध्ये प्राथमिक शिक्षकांना लाखाचे विमा कवच प्रस्ताव सादर करण्यापासून वंचित ठेवल्या गेले आहे. त्यामुळे कोरोना काळात काम करणाऱ्या शिक्षकांवर अन्याय झालेला आहे.
शिक्षक संघटना देखील या मागणीला घेऊन आग्रही आहे. त्यामुळे विमा सुरक्षा कवच योजनेत प्राथमिक शिक्षकांचा समावेश करावा अशी लोकहितकारी मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्याकडे केली आहे