'War and Peace' (Twitter) : आत्महत्येच्या काही तासांपूर्वी डॉ. शीतल आमटेंचे ट्विट; मीडिया वर विविध चर्चा सुरु, नेमके काय सांगायचे होते ' #DrSheetalAmte


'War and Peace' (Twitter) : आत्महत्येच्या 
काही तासापूर्वी डॉ. शीतल आमटेंचे ट्विट; मीडिया वर विविध चर्चा सुरु, नेमके काय सांगायचे होते ' 

चंद्रपुर / आनंदवन : आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची बातमी कळताच सामाजिक वर्तुळात खळबळ निर्माण झाली. त्यांची मानसिक स्थिती ठीक नसल्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. मात्र, आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी 'वॉर अँड पीस' असे लिहित ट्विट केले होते.

चंद्रपुर जिल्ह्यातील आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ . शीतल आमटे करजगी यांनी विषाचे इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली . त्यामुळे सामाजिक वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे . त्यांनी काही तासांपूर्वी हे कॅनव्हासवरील एक चित्र ट्विट करत ' वॉर अँड पीस ' असं लिहिलंय . त्यामुळे त्या या ट्विटमधून नेमके काय सांगू पाहत होत्या ? अशी चर्चा रंगली आहे .
आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास डॉ . शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची बातमी कळताच सामाजिक वर्तुळात खळबळ निर्माण झाली . त्यांची मानसिक स्थिती ठीक नसल्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे . मात्र , आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी ' वॉर अँड पीस ' असे लिहित ट्विट केले होते . त्यांच्या आत्महत्येनंतर त्यांचे ट्विट चर्चेत आले आहे .