चंद्रपूर शहर काँग्रेसचे महापालिकेसमोर आंदोलन, उपायुक्तांना निवेदन
कचरा संकलन कंत्राट प्रक्रिया रद्द करण्याची मागणी
चंद्रपूर : महानगरपालिकेकडून राबविण्यात येणारी कचरा संकलन कंत्राट प्रक्रिया रद्द करण्याच्या मागणीसाठी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसच्या पुढाकारातून सोमवारी (ता. २८) आंदोलन करण्यात आले. शहर जिल्हाध्यक्ष रितेश उर्फ रामू तिवारी यांच्या नेतृत्त्वात आंदोलन पार पडले. त्यानंतर उपायुक्त विशाल वाघ यांना निवेदन सादर करण्यात आले.
चंद्रपूर शहर महानगरपालिकेने शहरातील घर ते घर कचरा गोळा करणे, कंपोस्ट डेपोपर्यंत कचरा वाहतूक करणे, नाली सफाईचा कचरा वाहतूक करणे या कामासाठी निविदा मागितल्या होत्या. या कामासाठी मे. स्वयंभू ट्रान्सपोर्ट पुणे या कंत्राटदाराचा १७०० रुपये प्रति मेट्रीक टन हा सर्वात कमी दर होता. त्यामुळे या कंत्राटदाराला दहा वर्षांसाठी कंत्राट मंजूर करण्यात आले. मात्र, नंतर मनपातील सत्ताधा-यांनी हे कंत्राट रद्द केले. त्यानंतर नवीन प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला.
नवीन कंत्राटात मे स्वयंभू ट्रान्स्प्रोर्ट या कंत्राटदाराने पुन्हा प्रति मेट्रिक टन २५५२ रुपय दराची निविदा सादर केली. ही निविदा सर्वात कमी दराची असल्याने या कंत्राटदारास स्थायी समितीने कंत्राट मंजूर केले आहे. मात्र, जुन्या आणि नवीन दरात तब्बल साडेआठशे रुपयांची दरवाढ आहे. यामुळे मनपाला तब्बल कोट्यवधी रुपयांचा फटका सहन करावा लागणार आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने स्वत: पुढाकार घेऊन सदर कंत्राट रद्द करून भविष्यात होणारा आर्थिक भूर्दंड वाचविण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. शहर जिल्हाध्यक्ष रामू तिवारी यांच्या नेतृत्त्वात उपायुक्त विशाल वाघ यांना निवेदन सादर करण्यात आले.
आंदोलनात महिला जिल्हाध्यक्ष चित्रा डांगे, महिला आघाडी शहराध्यक्ष सुनीता अग्रवाल, विनोद दत्तात्रय, नगरसेवक प्रशांत दानव, नगरसेवक नीलेश खोब्रागडे, नगरसेवक अमजद अली, नगरसेविका विना खनके, नगरसेविका संगीता भोयर, नगरसेविका ललिता रेवेल्लीवार, सोहेल शेख, अश्विनी खोब्रागडे, प्रवीण प‹डवेकर, राजू रेवेल्लीवार, विजय चहारे, अनू दहेगावकर, सुनील वडस्कर, प्रसन्ना शिरवार, मनीष तिवारी, युसूफ भाई, इक़बाल भाई, दुर्गेश कोडाम, मोहन डोंगरे, चंद्रमा यादव, केशव रामटेके, विजय धोबे, उमाकांत धांडे, भालचंद्र दानव, सचिन कत्याल, निखिल काच्छेला, कुणाल चहारे, राजेश अड्डूर, काशिफ अली, नवशाद शेख, रुचित दवे, राहिल कादर, यश दत्तात्रय, संजय गंपावार, नीतेश कौरासे, विनोद संकत, पप्पू सिद्दीकी, राजू वासेकर, काशिफ अली, रमीज़ शेख, कुणाल रामटेके, सनी लहामगे, प्रकाश अधिकारी, केतन दुर्सेलवार, वैभव येरगुडे, मोनू रामटेके, वैभव रघाताटे, बापू अन्सारी, अजय बल्की यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.
कचरा संकलन कंत्राट प्रक्रियेत मोठी अनियमितता झाली आहे. कमी रकमेचे आधीचे कंत्राट रद्द करून दुसèयांदा प्रक्रिया राबविली गेली. आता आधीपेक्षा जास्त दर असलेल्या निविदेला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. यामुळे मनपा प्रशासनाचे कोट्यवधींचे नुकसान होणार आहे. ही प्रक्रिया रद्द करावी, अन्यथा न्यायालयात दाद मागितली जाणार आहे.