भारतीय जैन संघटनेचे प्रदेश अध्यक्ष हस्तीमल बंब यांचा राज्यस्तरिय दौरा #BJS #महाराष्ट्रप्रदेश

जैन संघटनेचे प्रदेश अध्यक्ष हस्तीमल बंब यांचा राज्यस्तरिय दौरा

जालना, 23 डिसम्बर:
भारतीय जैन संघटना, महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष श्री हस्तीमलजी बंब यांचे राज्यस्तरिय संपर्क दौरा आयोजित करण्यात आले आहे. या दौर्‍याचे मुख्य उद्देश्य ज्या - ज्या जिल्ह्यात जलसंधारण ची कामे राबविण्यात आलेले आहे, तसेच नुकतेच सुरु करण्यात आलेले उपक्रम शांतिलाल मुथ्था फाऊँडेशनचे सहयोगी शिक्षण अभियान, समाज विद्या केंद्र त्याच बरोबर समाज उत्थान, मानवीय सेवेचे उपक्रम बद्दल प्रत्येक जिल्ह्याचे आढावा घेऊन, पाहणी करून पुढील 2021-22 कार्यकाळासाठी नवीन महिला-पुरुष पदाधिकार्‍यांची निवड करणे असे आहे. संघटनेचे संस्थापक श्री शांतिलालजी मुथ्था, राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्रजी लुंकड यांनी दिलेल्या सुचनानुसार कोरोना मुळे समाजात, व्यवसायात आलेले बदल स्विकारून संघटनेत फार मोठे बदल होणे गरजेचे आहे. सर्व क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक झाले आहे इ. विषयावर पदाधिकार्‍यांना श्री बंब मार्गदर्शन करतील. या दौर्‍याचे तपशीलवार दिनांक 25 डिसेंबर, शुक्रवार रोजी सकाळी 9 वा. बुलढाणा, दुपारी 1 वा. अकोला, संध्याकाळी 6 वा. वाशिम, दि. 26 डिसेंबर, शनिवार रोजी सकाळी 10 वा. लातुर, दुपारी 3 वा. उस्मानाबाद, रात्री 8 वा. बीड, तसेच दि. 27 डिसेंबर, रविवार रोजी सकाळी 10 वा. अहमदनगर, सायंकाळी 7 वा. औरंगाबाद, शेवटी 28 डिसेंबर सोमवार रोजी सकाळी 10 वा. जालना जिल्हा च्या पदाधिकार्‍यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. कोव्हिड काळात शासनाचे सर्व नियमाचे पालन करून सदर बैठक आयोजित करण्यात आली आहे. या सर्व जिल्ह्यात जवळपास 100 जे.सी.बी., पोकलेंड ही मशिने नदी-नाले खोलीकरण, रुंदीकरण, गाळ काढण्याचे कामासाठी मोफत संघटने तर्फे देण्यात आलेली आहे. टप्प्या टप्प्याने संपुर्ण महाराष्ट्रात जलसंधारणाचे कामे हाती घेण्याचे मानस आहे. संघटनेचे राज्य कार्यालय जालन्यात असल्यामुळे जालना जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. या महत्वपुर्ण दौर्‍याची व योजनेची पुर्व तयारीसाठी भारतीय जैन संघटना घनसावंगी तालुका सचिव नरेंद्र जोगड राज्य अध्यक्ष हस्तीमल बंब यांच्या सोबत या दौऱ्यात राहतील व अ‍ॅड. अभय सेठिया, पवन सेठिया, धनराज जैन, ताराचंद कुचेरिया, जिल्हाध्यक्ष अशोक संचेती, शिखरचंद लोहाडेे, किरण रायबागकर, संतोष पहाडे ,भोकरदन तालुका अध्यक्ष मयुर बाकलीवाल  इ. परिश्रम घेत आहे. तरी प्रत्येक जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांनी व जिल्हा समन्वयक यांनी या बैठकीत आर्वजुन उपस्थित रहावे, असे आव्हान प्रदेश अध्यक्ष हस्तीमलजी बंब यांनी केले आहे.