पहिले हिंदकेसरी, पैलवान श्रीपती खंचनाळे यांना जगनगुरु व्यायामशाळेतर्फे श्रद्धांजली #पहिलेहिन्दकेसरी

पहिले हिंदकेसरी, पैलवान श्रीपती  खंचनाळे यांना जगनगुरु व्यायामशाळेतर्फे श्रद्धांजली

महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातलं मोठं नाव आणि पहिला मानाचा हिंदकेसरी किताब पटकावणारे श्रीपती खंचनाळे यांचं निधन झाल्याची बाब मनाला सल लावणारी असून नवीन पैलवानांना  ऊर्जा व प्रेरणा देणाऱ्या हिंद केसरी यांना चंद्रपुरातील जगन गुरु व्यायाम शाळेच्या पैलवानांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 

    या श्रद्धांजली कार्यक्रमात बाळू काटकर, रघुवीर अहिर, शाम राजूरकर, सुहास बनकर आदी पैलवान उपस्थित होते.

१९५९ साली पंजाब केसरी बनाता सिंगला धोबीपछाड देत श्रीपती खंचनाळे यांनी हिंदकेसरची गदा पटकावत कोल्हापूरचं नाव उज्वल केलं. याच वर्षात खंचनाळे यांनी कराड येथे झालेल्या महाराष्ट्र केसरीचंही विजेतेपद पटकावलं होतं. १९५८, १९६२ आणि १९६५ साली झालेल्या ऑल इंडिया चॅम्पिअनशीप स्पर्धेची विजेतेपदही खंचनाळे यांनी पटकावली होती त्यांची हि कारकीर्द म्हणजे भविष्यात येणाऱ्या पैलवानांसाठी एक प्रेरणाच आहे. त्यांचा  आदर्श उराशी बाळगून चंद्रपूरच्या मातीतून अशे पैलवान नक्कीच घडतील असा विश्वास यावेळी रघुवीर यांनी व्यक्त केला.