गत 24 तासात चंद्रपुर जिल्ह्यात 23 कोरोनामुक्त 16 पॉझिटिव्ह ; एक मृत्यू Corona

गत 24 तासात 23 कोरोनामुक्त  
16 पॉझिटिव्ह ; एक मृत्यू
 
  आतापर्यंत 22,491 जणांची कोरोनावर मात

  ॲक्टीव पॉझिटिव्ह 151
 
चंद्रपूर, दि. 28 :  जिल्ह्यात मागील 24 तासात 23 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 16 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून एका बाधीताचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 23 हजार 31 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 22 हजार 491 झाली आहे. सध्या 151 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 98 हजार 274 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 72 हजार 398 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील तुकुम येथील 65 वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 389 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 351, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 19, यवतमाळ 15, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 16 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील पाच, चंद्रपूर तालुका एक, बल्लारपूर चार, भद्रावती एक, ब्रम्हपुरी दोन, वरोरा दोन व इतर ठिकाणच्या एका रुग्णांचा समावेश आहे.

कोरोना आजार अद्याप गेलेला नाही, कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन अद्यापही आढळून येत आहेत. तरी नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे..