भारतीय जनता युवा मोर्चा वरोरा शहरातील युवकांचा जाहीर पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम संपन्न #BJPWarora #BJYMWarora

भारतीय जनता युवा मोर्चा वरोरा शहरातील युवकांचा जाहीर पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम संपन्न

चंद्रपुर/वरोरा : भारतीय जनता युवा मोर्चा वरोरा शहराच्या वतीने शहरातील अनेक युवकांनी मा.आ.सुधिरभाऊ मुनगंटीवार, माजी केन्द्रीय गृहराज्यमंत्री मा.हंसराजजी अहीर व भाजपा जिल्हाध्यक्ष मा.देवरावजी भोंगळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मा.आशिषजी देवतळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व वरोरा शहराचे नगराध्यक्ष मा.अहेतेशामजी अली यांच्या अध्यक्षतेखाली, भाजपा शहराध्यक्ष सुरेशजी महाजन, नगरसेवक दिलीपजी घोरपडे ,ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाशजी दुर्गपुरोहित,जिल्हा उपाध्यक्ष इम्रान खान, जिल्हा सचिव महेशजी श्रीरंग, केतन शिंदे, विद्यार्थी आघाडी जिल्हा सहसंयोजक प्रतिक बारसागडे,  माजी जिल्हा उपाध्यक्ष आकाश वानखेडे, सोशल मीडिया जिल्हा संयोजक आदीत्य शिगांडे ,सोशल मीडिया विधसनसभा प्रमुख राहुल बांदुरकर , शहर उपाध्यक्ष संजूजी राम, अभिषेक सातोकर,राहुलजी दागमवार,रोशनजी लखोटे, निषिकांतजी डफ,अभिजितजी गयनेवार,कुणालजी नक्षीने, अमोल शेंडे, प्रतीक काळे,यांच्या विशेष उपस्थितीत परी ला‌न वरोरा येथे अमोलजी देऊडकर युवा मोर्चा जिल्हा कार्यकारिणी सदस्य यांचा माध्यमातून कार्यक्रम पार पडला. 
 यावेळी मान्यवरांच्या हस्ते युवकांना पक्षाचा दुपट्टा व पुष्पगुच्छ देऊन युवा मोर्चा मध्ये प्रवेश करण्यात आला. याप्रसंगी युवा मोर्चाचे असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.