आता 1500 स्क्वेअर फुटांपर्यंत घर बांधण्यासाठी परवानगीची गरज नाही, एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा #1500FTHomeNoPermission #महाराष्ट्रसरकार


आता 1500 स्क्वेअर फुटांपर्यंत घर बांधण्यासाठी परवानगीची गरज नाही, एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

औरंगाबाद 13 फेब्रूवारी (जिमाका) : आता 1500 स्क्वेअर फुटांपर्यंत घर बांधण्यासाठी परवानगीची गरज नाही, अशी घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी केलीय. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज औरंगाबाद महापालिकेच्या अंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेतला त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नगरविकास विभागाच्या वतीने मोठा निर्णय घेतला गेला असून, 31 डिसेंबर 2020 पर्यंतची बांधकामे नियमित होतील, त्याचबरोबर 1500 स्क्वेअर फूट घर बांधायचे असेल तर महापालिकेची परवानगी घेण्याची गरज नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

3 हजार स्क्वेअर फूट घरं बांधणाऱ्यांसाठी 10 दिवसांत परवानगीः एकनाथ शिंदे

राज्यातील 55 हजार कुटुंबांना गुंठेवारीचा फायदा होणार असून, 3 हजार स्क्वेअर फूट घरं बांधणाऱ्यांसाठी 10 दिवसांत परवानगी देणार असल्याचं देखील त्यांनी जाहीर केलं.

नवीन तयार होणाऱ्या इमारती मधील सांस्कृतिक कार्यक्रमासाठी(Recreation floor) आणि इतर कार्यक्रमासाठी  एक मजल्यासाठी एफएसआय देण्यात येणार आहे.

थकीत वीजबिल असलेल्या शेतकऱ्यांची वीज तोडणी केली जात असल्याने याबाबत मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्र्यांशी बोलणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय.