महाराष्ट्र सरकार चे 4 दिवसात 5 वे मंत्री यांना कोरोना, राष्ट्रवादी आमदाराच्या लग्नात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांसह हजेरी #MaharashtraSarkarMantri #Covid-19

महाराष्ट्र सरकार चे 4 दिवसात 5 वे  मंत्री यांना कोरोना

राष्ट्रवादी आमदाराच्या लग्नात
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद
 पवारांसह हजेरी

मुंबई, 22 फेब्रूवारी : राष्ट्रवादीच्या आणखी एका बड्या नेत्याला कोरोनाची लागण झालीये. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. ट्विट करुन भुजबळ यांनी ही माहिती दिली आहे. 
माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या दोन तीन दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी, असं आवाहन भुजबळ यांनी केली. तसंच माझी प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असंही ते म्हणाले आहेत.

राष्ट्रवादीच्या देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे यांचा लग्नसोहळा काल नाशिकमध्ये पार पडला. या सोहळ्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर भुजबळ यांनी हजेरी लावली होती. लग्न सोहळा पार पडून आणखी 24 तासही उलटत नाहीयत, तोपर्यंतच भुजबळ यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.