आताची मोठी बातमी : कोविड लस घेतली तरी जिल्हाधिकाऱ्यांना कोरोणा लागण झाली (कोरोना पॉजिटिव) जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केला खुलासा, कोविडबाबत खबरदारी घेण्याचे आवाहन केला खुलासा #CollectorOsmanabad #Covid-19

कोविड लस घेतली तरी जिल्हाधिकाऱ्यांना कोरोणा लागण झाली जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केला खुलासा

कोविडबाबत खबरदारी घेण्याचे आवाहन केला खुलासा 

 उस्मानाबाद,दि.21 फेब्रूवारी (जिमाका): समाजमाध्यमांमध्ये कोविड लस घेतली तरी जिल्हाधिकाऱ्यांबना कोरोणा लागण झाली अशा स्वरूपाच्या बातम्या येत आहेत. त्यातून लोकांमध्ये चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून  जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर हा खुलासा केला आहे .

मागील काही दिवसांपासून  शासकीय  कार्यालयांमधील गर्दी प्रचंड वाढली. लोक मास्क न घालता गर्दी करत. आपण त्यांना सांगितल्यावर मास्क लावत. पण माझ्याबाबतीत तोवर व्हायचा तो परीणाम झालाच असे म्हणावे लागेल. त्यामुळे नो मास्क नो एन्ट्री आवश्यक आहे. 

मी दोन आठवड्यांपूर्वी लस घेतली आहे. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. पण कोविड विरुद्ध पूर्ण क्षमता तयार होण्यास दुसरा डोस आणि त्यानंतर काही दिवस लागतात . त्यामुळे लस घेतल्यानंतरही मास्क वापरण्याच्या सूचना आरोग्य विभागाने यासाठीच दिल्या आहेत. हे सर्व पाहता आपण सर्व फ्रंट लाईन वर्कर्स जसे की महसूल, आरोग्य, पोलीस यांनी अत्यंत सावध राहावे. कोणतेही लक्षण अंगावर न काढता तपासणी करून घ्या.मला समाधान आहे की उस्मानाबाद जिल्ह्यात मागील सहा महिन्यात ज्या सोयीसुविधा आपण शासकीय रुग्णालयांत निर्माण केल्या त्याचाच लाभ मलाही मिळत आहे. मागील आठवडाभरात आपण कोविड च्या दुसऱ्या लाटे साठी तयार सुरू केली आहे.

   मी लस घेतली आहे त्यामुळे ताप आला तरी कोणतीही चाचणी करण्याची गरज नाही असे मानून दुर्लक्ष केले असते तर माझ्याकडून लोकांना संसर्ग झाला असता. माझ्यासोबत माझी पत्नी प्रियांका बोकील याही कोविड-19 पॉझिटीव्ह आल्या आहेत. त्यामुळे कुटुंबीयांची कोविड तपासणी महत्वाची ठरते. यामुळे नागरिकांना पुनश्च आवाहन की कोणतेही लक्षण अंगावर काढू नये. लवकरात लवकर तपासणी करून घ्यावी.काल केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य विभागाची एसओपी प्राप्त झाली आहे. त्या एसओपी आणि  राज्य शासनाच्या विविध सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.आपण सर्वजण मागील एक वर्षापासून कोविडच्या साथीचा सामना करत आहोत. इतिहासाला नोंद घ्यावी लागेल इतके मोठे  काम महाराष्ट्रातील यंत्रणांनी केले आहे. पुढेही करत राहू. अशी सदिच्छा श्री .कौस्तुभ दिवेगावकर यांनी व्यक्त केली आहे.