हृदय सिंहासनावर कोरला गेला आहे - ना. हंसराज अहीर
चंद्रपूर: शिवरायांनी असामान्य शौर्य व कर्तृत्वाच्या बळावर स्वराज्याची स्थापना केली व मुघल साम्राज्याला उद्ध्वस्त केले. मात्र यासाठी छत्रपतींच्या मावळîांनी स्वराज्य रक्षणार्थ जे शौर्य गाजवले त्या इतिहासाचे स्मरण देशवासीयांना असल्याने या शौर्याचा इतिहास आमच्या शुरवीर सैन्यांच्याही हृदय सिंहासनावर कोरला गेला आहे असा दृढविश्वास पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी छत्रपती शिवाजी चैक येथे महाराजांना नमन करतांना व्यक्त केला.
दि. 19 रोजी छत्रपती शिवाजी चौक ,चंद्रपूर येथे आयोजित शिवजयंती उत्सवाला संबोधित करतांना ते बोलत होते. या कार्यक्रमास वरोरा विधानसभा संपर्क प्रमुख श्री विजय राऊत, श्री राजु अडपेवार, श्री मोहन चैधरी, श्री राजु घरोटे, प्रमोद शास्त्रकार, श्री राजु येले, पुनम तिवारी, विनोद शेरकी, गौतम यादव, गिरीष अणे, विकास खटी, तुशार मोहुर्ले, राहुल गायकवाड, जितेश वासेकर, धनंजय मुफ्कलवार, प्रणय डंबारे, निलेश खोलापुरे, राहुल बोरकर मान्यवरांची याप्रसंगी उपस्थिती लाभली होती.
या देशाला शिव छत्रपतींचा वारसा लाभलेला आहे. अनेक शुर नरवीर योध्दîांनी आपल्या शौर्याचा परिचय दिला आहे. त्यांच्या या प्रेरणेतून कोट्यवधी देशभक्त युवक मातृभूमीच्या रक्षणासाठी सज्ज आहेत. हा देश लोकांचा आहे. त्यामुळे युवकांनी केवळ उत्सव म्हणुन या शिवजयंतीच्या महोत्सवाकडे न बघता महाराजांच्या शौर्याच्या गाथेतून, त्यागातून, राष्ट्रभक्तीतून आपले जीवन राष्ट्राच्या उन्नतीकरीता खर्ची घालावे असे आवाहन ना. अहीर यांनी केले.
या कार्यक्रमास शेकडो शिवभक्त युवक व माता भगीनींची उपस्थिती होती.