हेलपिंग हॅन्ड्स बल्लारपूर हिरकणी द्वारा आयोजित महिलांचे क्रिकेट सामन्यांचे उदघाटन #HelpingHands #BallarpurHirakaniCricket

हेलपिंग हॅन्ड्स बल्लारपूर हिरकणी द्वारा आयोजित महिलांचे क्रिकेट सामन्यांचे उदघाटन

चंद्रपुर/ बल्लारपुर : माउंट महाविद्यालय  बल्लारपूर येथे हेलपिंग हॅन्ड्स बल्लारपूर हिरकणी द्वारा आयोजित  महिलांचे क्रिकेट सामन्यांचे पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते उदघाटन झाले. महिलांना या क्रिकेट सामन्यांच्या आयोजनामुळे आपल्या खेळाडू वृत्तीचे प्रदर्शन करण्यासाठी खेळपट्टी उपलब्ध करून दिल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले. 
यावेळी कोरोना संकटकाळात बल्लारपुरात अहोरात्र सेवा देणाऱ्या कोविड योध्यांचा सत्कार करून  इंटरनॅशनल टेनीस बॉल क्रिकेट सामन्यासाठी कु. राऊत हिची निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले. 
यावेळी बल्लारपूरचे नगराध्यक्ष  हरीश शर्मा,  लखनजी चंदेल, श्रीनिवास सुंचूवार, जुम्मन शेख रिझवी,  राजू घरोटे,  विकास खटी,  हेलपिंग हॅन्ड्स बल्लारपूर हिरकणी च्या फाउंडर प्रेसिडंट स्नेहा भाटिया, प्रेसिडंट डॉ मंजुषा कल्लुरवार, सचिव संजना मुलचंदानी आदींची उपस्थिती होती.