महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी कोरोनाची लस घेतली नाही; अखेर कारण आलं समोर #MaharashtraChiefMinister #CovidVaccine

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी कोरोनाची लस घेतली नाही

अखेर कारण आलं समोर

मुंबई, 05 मार्च : सोमवार 1 मार्च 2021 पासून सर्वसामान्यांसाठी कोरोना लसीकरण सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक मंत्र्यांनी कोरोनाची लस घेतली. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक तसंच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीदेखील कोरोनाची लस टोचून घेतली. मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र कोरोनाची लस घेण्याचं टाळलं. यामुळे मोठी चर्चा सुरू झाली होती. देशभरात कोरोनाचं लसीकरण केलं जात असताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मात्र लस घेण्यापासून दुरावा ठेवला. 

अखेर त्यांनी लस टोचून न घेण्याचं कारण समोर आलं आहे. याबाबत सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री कोरोनाची लस न घेण्याबाबत म्हणाले की, अधिवेशन संपल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने लस घेण्यात येईल. हृदयावर शस्त्रक्रिया झाली असल्याकारणाने डॉक्टरांच्या सल्ल्याने लस घेईन, अशी माहिती समोर आली आहे.