Maharashtra Covid-19: महाराष्ट्र राज्यात कोरोना रुग्णसंख्येचा उद्रेक! देशात कोरोनाची दुसरी लाट ? #Corona #Covid-19 #महाराष्ट्र #इंडिया

Maharashtra Covid-19: महाराष्ट्र राज्यात कोरोना रुग्णसंख्येचा उद्रेक! 

देशात कोरोनाची दुसरी लाट?

मुंबई : महाराष्ट्र राज्यात मागील काही दिवसांपासून सुरु असणारं कोरोनाचं थैमान काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाही आहे. आज तर कोरोना रुग्णसंख्येने नवा उच्चांक गाठला आहे. सातत्यानं वाढणारी रुग्णसंख्या पाहता लॉकडाऊनची छाया गडद होताना दिसत आहे. 

महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागानं प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार मंगळवारी दिवसभरात राज्यात एकूण 21,63,391 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचा आकडा पाहता राज्यातील कोरोनामुक्त होणाऱ्यांचं प्रमाण  91.26 टक्के इतकं झालं आहे. तर आज राज्यात 23,179 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर राज्यात आज 84 कोरोना बाधित रुग्णाच्या मतृयांचूी नोंद झालीय. सध्या राज्यातील मत्यूदर 2.24% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1,78,35,495 प्रयोगशाळा नमनुयाांपैकी 23,70,507 (13.29 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात आज एकूण 1,52,760 अॅक्टिव रुग्ण आहेत.

देशात कोरोनाची दुसरी लाट?

देशात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ व्हायला सुरुवात झाली आहे. या कोरोनाच्या स्थितीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. देशातील कोरोनाची स्थिती आणि लसीकरणाची स्थिती या विषयावर त्यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला वेळेत रोखणे गरजेचं आहे. कोरोना संबंधीच्या नियमांचं पालन करणे गरजेचं आहे. गेल्या वर्षभरातील कोरोनाविरोधातील लढाईचं यश बेजबाबदारीत बदललं गेलं नाही पाहिजे. टेस्टिंग आणि ट्रेसिंग वेळेत होणे गरजेचं आहे. अनेक राज्यांमध्ये रॅपिड टेस्टवर जोर दिला जात आहे. मात्र आरटीपीसीआर टेस्ट 80 टक्क्यांच्यावर ठेवायला हव्यात, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.

आज जळगाव, नांदेड, कल्याण-डोंबिवली, नागपूर, मुंबईसह सगळ्याच भागाता कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. 

पुणे : दिवसभरात 2587 रुग्णांची वाढ
पिंपरी चिंचवड : आज 1248 रुग्ण आढळले आहेत.
अकोला : 24 तासात कोरोनाचे 470 नवीन रुग्ण, तर 6 रुग्णांचा मृत्यू.
चंद्रपूर: गेल्या 24 तासात 164 नव्या रुग्णांची नोंद तर 2 मृत्यु.
कल्याण डोंबिवली : सर्वाधिक 593 रुग्णांची नोंद. 
जालना :  कोरोनाचे नवे 552 रुग्ण, तर 4 रुग्णांचा मृत्यू
अमरावती : 406 कोरोना बाधित रुग्णांची वाढ
रायगड - जिल्ह्यात दिवसभरात 307 रुग्णांची वाढ
नागपूर : सर्वाधिक 3370 नवे रूग्ण वाढले, तर16 मृत्यु.