स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यूचे पालन करावे, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे आवाहन Chandrapur Janta Curfew

नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यूचे पालन करावे

जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे आवाहन

चंद्रपूर दि.19 एप्रिल:  कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्हयाअंतर्गत सर्व व्यापारी संघ, स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधी यांच्या सूचना व सहमतीने चंद्रपूर जिल्हा अंतर्गत दैनंदिन वाढत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता त्यावर प्रतिबंध करणे व कोरोना संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी दि. 21 एप्रिल 2021 ते 25 एप्रिल 2021 व दि. 28 एप्रिल 2021 ते  दि.1 मे 2021 या कालावधीमध्ये नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

दि. 21 एप्रिल 2021 ते 25 एप्रिल 2021 व दि. 28 एप्रिल 2021 ते दि.1 मे 2021 या कालावधीमध्ये सर्व दवाखाने व औषधी दुकाने, कृषी केंद्र व पशुखाद्य दुकाने, सर्व शासकीय कार्यालये, बँक, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत औद्योगिक आस्थापना कार्यालयीन दिवशी सुरू राहतील. तसेच घरपोच सेवा सह दूध वितरण, वर्तमानपत्र, एलपीजी गॅस वितरण, पेट्रोल पंप व हॉटेलमधून डिलिव्हरी बॉय द्वारे घरपोच सेवा सुरू राहील. परीक्षेसाठी येणारे विद्यार्थी व त्यांचे सोबत त्यांचे पालक यांना परवानगी राहील विद्यार्थ्यांनी स्वतःसोबत परीक्षेचे प्रवेशपत्र बाळगावे.

दि.21 एप्रिल  2021 ते दि. 25 एप्रिल 2021 व 28 एप्रिल 2021 ते दि. 1 मे 2021 या कालावधीमध्ये वरील प्रमाणे सेवा सुरू राहतील. त्या व्यतिरिक्त सर्व किराणा दुकान, भाजीपाला व फळे, सर्व प्रकारच्या व्यापारी आस्थापना दुकाने उपरोक्त कालावधीत बंद राहतील. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व पानठेले/ चहा टपरी व हातगाडी, फूटपाथ वरील चायनीज सह इतर सर्व प्रकारची दुकाने आस्थापना बंद राहतील.

दि.26 एप्रिल व 27 एप्रिल 2021 रोजी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू राहतील. जिल्ह्यातील राजुरा, कोरपणा, जिवती व नागभीड या तालुक्यामध्ये आजपासूनच जनता कर्फ्यू पाडला जात आहे.

कोरोना चा वाढता संसर्ग पाहता रोग प्रसाराची साखळी खंडित करण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यूचे पालन करावे. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. व दिलेल्या नियमांचे पालन करावे अशा सूचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिल्या.