४ प्रतिष्ठानांवर कारवाई
कारवाईत १२ हजारांचा दंड वसूल
चंद्रपूर, ता. २३ : राज्य शासनाच्या निर्देशानुसार महानगरपालिका हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, प्रतिष्ठाने, बाजारपेठा बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तरी सुद्धा काही व्यावसायिक आपली प्रतिष्ठाने सुरु करून कोरोना नियमांचे उल्लंघन करीत आहेत. अशा प्रतिष्ठानांवर मनपाद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. शुक्रवारी (ता. २३) मनपाने चंद्रपूर शहरातील झोन क्रमांक १ अंतर्गत येणाऱ्या ४ प्रतिष्ठानांवर कारवाई करून १२ हजार रूपयाचा दंड वसूल केला.
मनपा आयुक्त राजेश मोहिते यांच्या निर्देशानुसार झोन क्र. एकच्या सहायक आयुक्त शीतल वाकडे, क्षेत्रीय अधिकारी भाऊराव सोनटक्के, मुख्य स्वच्छता निरीक्षक प्रदीप मडावी, तसेच अतिक्रमण पथक यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.
कारवाईत श्रीकृपा डेली निड्स, निलिमा उपहारगृह, अभिजित वडके (पानटपरी), सेवकराम दिगवाणी (अंडा विक्री) वर दंडात्मक कारवाई करुन एकूण दंड १२,०००/- वसूल करण्यात आले. यापुढेही नियमांचे उल्लंघन केल्यास प्रसंगी प्रतिष्ठान सील करण्यात येईल, अशी ताकीद मनपाकडून देण्यात आली.