महाराष्ट्र राज्यात कडक लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री दोन दिवसात निर्णय घेतील : मंत्री विजय वडेट्टीवार, गरज पडली तर लॉकडाउनचा कालावधी वाढू शकेल, Maharashtra Lockdown Extend?

महाराष्ट्र राज्यात कडक लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री दोन दिवसात निर्णय घेतील : मंत्री विजय वडेट्टीवार

गरज पडली तर लॉकडाउनचा कालावधी वाढू शकेल,

मुंबई,19 अप्रैल : महाराष्ट्र राज्यात कडक लॉकडाऊन बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन दिवसात निर्णय घेतील. गरज पडली तर लॉकडाउनचा कालावधी वाढू शकेल, असं मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. लॉकडाऊन आतापर्यंत 30 तारखेपर्यंत आहे. ती मुदत वाढवावी लागेल, असं ते म्हणाले. 

 मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले की, लॉकडाऊन काळात लोकांना मदत करण्याबाबत आढावा घेतला. पुढच्या आठवड्यात सगळ्यांना मदत मिळाली पाहिजे. ते म्हणाले की, नाभिक समाजाला मदत कशी करायची यावर विचार सुरु आहे. माहिती गोळा करून कशी मदत करायची यावर चर्चा सुरु आहे. बांधकाम कामगार, ऑटो रिक्षाचालकांच्या नोंदी आहे