चंद्रपुर जिल्ह्यातील लाठी पोलिसांची गो - तस्करांवर मोठी कारवाई, 49 लाखांच्या मुद्देमालासहित 11 आरोपी अटकेत

लाठी पोलिसांची गो - तस्करांवर मोठी कारवाई,

49 लाखांच्या मुद्देमालासहित 11 आरोपी अटकेत

चंद्रपुर,13 जून: आज 13 जून रोजी सावली येथुन हैद्राबाद येथे गोवंशीय जनावर यांची कत्तलीकरीता मौजा आर्वी रोडने दोन आयचर १ ) क . MH - 34 / BG - 8308 , 2 ) MH - 34 / AB - 1204 तसेच अशोक ले - लॅड ईकोमेट वाहन क्रमांक TS 20 / T6140 अशा एकुण तिन ट्रक मध्ये गोवंशीय जनावरे निर्दयतेने व कृरतेने कोंबुन कत्तल करण्याचे इऱ्यादयाने वाहतुक करीत असल्याची माहिती मा . अपर पोलीस अधीक्षक तथा प्रभारी पोलीस अधीक्षक , चंद्रपूर श्री . अतुल कुलकर्णी यांना गोपनियरित्या माहिती प्राप्त झाली असता त्यांनी पोउपनि . राठोड , उप पो . स्टे . लाठी यांना मार्गदर्शकरून नाकाबंदी करून वाहने थांबवुन वाहनाची तपासणी करण्यास सुचीत केले . त्यांचे सुचना प्रमाणे श्री . राठोड , पोउपनि . उपपोस्टे . लाठी , पो . स्टॉफ तसेच नक्षल विरोधी अभियान पथकातील कर्मचारी यांनी नाकाबंदी करून नमुद वाहनाची तपासणी केली असता त्यात पोलीसांना ८६ जनावरे किं . ८,४०,००० / रू . , दोन आयचर व एक अशोक ले - लॅड ईकोमेट चारकाकी वाहन किं . ३० लक्ष रूपये , पायलटींग करीता वापरण्यात आलेले स्कॉपीओ गाडी क्र . MH - 34 / AD 6769 किं . ६,००,००० / -रू . , स्कॉटींग करीता वापरण्यात आलेले टाटा इंडीगो वाहन क . MH - 42 / AH - 0592 किं . ४,००,००० व तसेच आरोपीतांच्या ताब्यातुन घेतलेले एकुण १० मोबाईल कि . १,०४००० / -रू . असा एकुण ४ ९ लक्ष ४४ हजार रू . आरोपीताकडुन जप्त करण्यात आला . आरोपी नामे . १ ) राजु बाबुराव नक्कावार , वय ३२ वर्षे रा . कविठपेठ , २ ) मारोती गणपत बेडलावार , वय ३१ वर्षे रा . कविठपेठ , ३ ) सत्यनारायण भिमय्या सोतकुल , वय २५ वर्षे रा . लक्कडकोट , ४ ) हफिज खान गुफरान खान , वय २७ वर्षे रा . गडचांदूर , ५ ) रेहान कय्युम केरेशी , वय २८ वर्षे रा . गडाचांदुर , ६ ) सनाउल्ला खान एहसान खान पठाण , वय २ ९ वर्षे रा . बल्लारशाह , ७ ) अलिम युसुफ खान बय २ ९ वर्षे रा . बल्लारशार , ८ ) शेख हमिद शेख मकदुम , वय २५ वर्षे रा . गोयगाव ( तेलंगना ) , ९ सोहेल अहमद शेख , वय १ ९ वर्षे रा . गडचांदूर , १० ) , ईरशाद गफार शेख , वय १ ९ वर्षे , रा . गोयगाव ( तेलंगना ) , ११ ) जाकिर अहमद शेख , वय २४ वर्षे रा . गोयगाव ( तेलंगना ) यांना अटक करण्यात आल असुन गो - वंशीय जनावरांचे मालक फरारा आरोपी नामे १ ) ईमरान कुरेशी , २ ) शहेबाज कुरेशी दोन्ही रा . गडचांदूर असे १३ आरोपी विरूध्द उप पोस्टे लाथे येथे अप . क . १५/२०२१ कलम ५ ( ब ) , ९ , ११ महाराष्ट्राचा प्राणी संरक्षण अधि . १ ९ ७६ सुधारीत २०१५ सह कलम ११ ( १ ) ( ड ) भारताचा प्राण्यास निर्दयतेने वागविणेस प्रतिबंध अधि . १ ९ ६० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . तसेच मिळुन आलेले गो - वंशीय जनावरांची सुटका करून जनावरांना सुरक्षीतपणे उज्जवल गो - रक्षण संस्था लोहारा , चंद्रपूर येथे इदाखल करण्यात आले आहे .

सदरची कारवाई मा . अपर पोलीस अधीक्षक तथा प्रभारी पोलीस अधीक्षक , चंद्रपूर श्री . अतुल कुलकर्णी , उपविभागीय पोलीस अधिकारी , राजुरा श्री . राजा पवार यांचे मार्गदर्शनात पोउपनि . श्री . श्री . राठोड , पोस्टे . लाठी , सोबत पो . स्टॉफ नापोशि / २६६४ गंगाधर , पोशि / २१० राहुल , पोशि / १ ९ ८६ वृषभ , पोशि ५२४ संजु , पोशि / ९ ०६ शंकर , पोशि / ११२ स्पप्नील , पोशी / २७११ विशाल तसेच नक्षल विरोधी अभियान पथक , ( C - 60 ) चंद्रपूर पथकातील पोलीस अंमलदार या सर्वाचे मदतीने पार पाडली .