सकारात्मक बातमी:महाराष्ट्रातील तीन चिमुकल्यांची डेल्टा प्लस विषाणूवर मात Positive News

सकारात्मक बातमी:
महाराष्ट्रातील तीन चिमुकल्यांची डेल्टा प्लस विषाणूवर मात

LoktantraKiAwaaz
#RatnagiriNews
रत्नागिरी, 29 जून : महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या डेल्टा प्लस वेरियंटचे सर्वाधिक रुग्ण रत्नागिरीमध्ये आढळून आले आहेत. महाराष्ट्रात डेल्टा प्लस विषाणूमुळे पहिला मृत्यू देखील रत्नागिरीत झाला आहे. मात्र, त्याच रत्नागिरी जिल्ह्यातून सकारात्मक बातमी समोर आली आहे. डेल्टा प्लस वेरियंटवर तीन मुलांनी यशस्वी मात केली आहे. संगमेश्वरमधील तीन मुलांना डेल्टा प्लसचा संसर्ग झालेला. ( Maharashtra 03 Children Cure From Corona Virus Delta Plus Variant)

महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक रुग्ण आढळलेल्या संगमेश्वरमध्ये तीन मुलांना डेल्टा प्लस विषाणूची बाधा झाली होती. तीन वर्ष चार वर्ष आणि सहा वर्षाच्या मुलांना डेल्टा प्लस विषाणूची लागण झाली होती. पण तीन मुलांची डेल्टा प्लस विषाणूवर यशस्वी मात केलीय.

पुण्यातल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या शास्त्रज्ञांनी महत्त्वाची माहिती दिलीय, महाराष्ट्रात डेल्टा प्लसच्या आणखी 14 नव्या केसेस सापडल्या आहेत. डेल्टा प्लसने आतापर्यंत 34 रूग्ण संक्रमित झाले आहेत. तसेच मध्य प्रदेशातून तपासणीसाठी आलेल्या नमुन्यांमध्ये आणखी तीन डेल्टा प्लस संक्रमित आढळले आहेत. अशाप्रकारे, देशात डेल्टा प्लसच्या एकूण रुग्णांती संख्या 66 झाली आहे.