विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धन चळवळ पुढे न्यावी- डी.के.आरिकर

विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धन चळवळ पुढे न्यावी- डी.के.आरिकर

वृक्षारोपण, पर्यावरण मित्र व कोविड योद्धा पुरस्कार

जागतिक पर्यावरण दिनी पर्यावरण संवर्धन समितीचा उपक्रम

चंद्रपूर- 
     मानवाने पर्यावरणाच्या केलेल्या हानीमुळे आज त्याचेच जीवन संपुष्टात आल्याचे दिसून येत आहे त्यामुळे भविष्यातील आरोग्य संपन्न समृद्ध मानवी जीवनासाठी विद्यार्थ्यांनी हा विषय समजून घ्यावा व पर्यावरण दूत होऊन मानवी जीवन वाचवावे व वृक्षसंवर्धन चळवळ पुढे न्यावी असे आवाहन दलीतमित्र व पर्यावरण समिती चे अध्यक्ष डी.के.आरिकर यांनी 5 जूनला जागतिक पर्यावरण दिनानिमित्य लॉ कॉलेज बायपास रोड वर झालेल्या वृक्षारोपण व पर्यावरण मित्र पुरस्कार सोहळ्यात व्यक्त केले. कार्यक्रमाचे आयोजन पर्यावरण संवर्धन व विकास समिती तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या वतीने करण्यात आले होते.
    यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी डी.के.आरिकर, प्रमुख मार्गदर्शक हिराचंद बोरकुटे, हरीश ससनकर, तर अतिथी डॉ.देव कन्नाके, वर्षा कोठेकर यांची उपस्थिती होती. 
   यावेळी लॉ कॉलेज बाय पास रोड तथा ओपन स्पेस मध्ये वड पिंपळ कडुलिंब या वृक्षांचे रोपण करण्यात आले. कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन करणारे माणिकराव लोणकर, अविनाश टिपले, रजनी मोरे, डी.बी.बेलखोडे, विजय भोगेकर, वैशाली रोहनकर यांना पर्यावरण मित्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले, नरेश बोरीकर, विजय गांगरेड्डीवार, डॉ.गजेंद्र गणिगर, डॉ.अमित जयस्वाल यांना कोविड योद्धा सन्मान देऊन गौरविण्यात आले, ईश्वर मेंढुलकर यांना जेष्ठ नागरिक सन्मान देण्यात आला तर राणी राव, संक्षिप्ता शिंदे, माया पटले, कौसर खान यांना सामाजिक कार्य सन्मान मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन अमित अडेट्टीवार यांनी तर प्रास्ताविक हरीश ससनकर यांनी केले.
     कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रा.माधव गुरुनुले, निखिल तांबोळी, रंजना नाकतोडे, पुरुषोत्तम राऊत, मनोहर रासपायले, मनोहर जाधव, वनश्री मेश्राम, रेखा जाधव, अक्षय बेलखोडे, अशोक मुसळे, विजय रोहनकर, रंजना आरिकर, संजय मासिरकर यांचे सहकार्य लाभले.