पहिल्या शहराचं नाव वाचून तुम्ही म्हणाल
#Loktantrakiawaaz
मुंबई: देशात 5 वर्षांपासून पॉर्न (Porn Sites) साइट्सवर बंदी आणण्यात आली आहे. मात्र तरीही अनेक लोक गुपचूप कोणत्या ना कोणत्या पद्धतीनं पॉर्न पाहण्याचा प्रयत्न करत असतात. नुकतीच 2020 मध्ये करण्यात आलेल्या एका सर्व्हेनुसार धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सर्व्हेनुसार भारतातील सर्वात जास्त पॉर्नसाइट्स या महाराष्ट्रात आणि त्यातही राज्यातील 3 जिल्हात पाहिल्या जातात.
साधरण 850 पॉर्न साइट्सवर (Porn Site Bann) बंदी घालण्यात आली होती. त्यानंतरही पॉर्न पाहण्याचं प्रमाण कमी झालं नाही. महाराष्ट्रात सर्वात जास्त पॉर्न साइट पाहणाऱ्यांची संख्या असल्याचं एका सर्व्हेमधून समोर आलं. गुगल पॉर्न सर्चिंगमध्ये महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांचा जास्त समावेश आहे. त्यामध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर पुणे आणि नाशिक किंवा नागपूरचा क्रमांक आहे.
पहिल्या क्रमांकावर जे शहर आहे त्याचं नाव ऐकून अनेकांचे डोळे विस्फारतील. शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याचा पॉर्न साइट पाहण्यात पहिला क्रमांक लागतो. दुसऱ्या क्रमांकावर नाशिक आणि तिसऱ्या क्रमांकावर नागपूर आहे.
अश्लील फिल्म पाहणे आणि पॉर्न साइटला भेट देणार्यांची संख्या जवळजवळ चौपट वेगाने वाढलेली दिसते. या पाहणाऱ्यांमध्ये आणि वापरकर्त्यांमध्ये शाळा-महाविद्यालयीन मुले आणि मुली, महिला आणि वृद्ध अशा सगळ्यांचा समावेश आहे. राज्याच्या उपराजधानीत पॉर्न पाहणाऱ्यांच्या संख्येत अचानक वाढ झाली आहे.
आता सायबर पोलिसांनी या नव्या ट्रेंडवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. सोशल मीडियावर पॉर्न शोधण्यासाठी किंवा शेअर करण्यासाठी भारतीय दंड संहितेच्या कलम 149 अन्वये आयटी कायद्याच्या कलम (67 (ए, बी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येऊ शकतो. त्यामुळे पॉर्न पाहणाऱ्यांवर सायबर पोलिसांची करडी नजर असणार आहे.