भाजपा समर्थ बूथ अभियानात चंद्रपूरने मारली बाजी #BJPSamarthBoothChandrapur

भाजपा समर्थ बूथ अभियानात चंद्रपूरने मारली बाजी

भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांना अहवाल सादर

राष्ट्रीय सहसंघटन सरचिटणीस शिवप्रकाश,माजी मुख्यमंत्री आ. फडणवीस यांनी केले कौतुक

 चंद्रपुर : भारतीय जनता पार्टीच्या समर्थ बूथ अभियानात चंद्रपुर जिल्ह्याने बाजी मारली आहे.विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख,माजी अर्थमंत्री आ सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात तयार झालेला, चंद्रपुरातील समर्थ बूथ अभियानाचा अहवाल बघून पक्षश्रेष्ठींनी  समाधान व्यक्त केले. 

अभियानाचे चंद्रपुर महानगर जिल्हा प्रमुख,महामंत्री ब्रिजभूषण पाझारे यांनी हा अहवाल भाजपा प्रदेश अध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांना मुबंई येथे सादर केला.

यावेळी माजी मुख्यमंत्री ,विरोधी पक्षनेते आ.देवेंद्र फडणवीस,भाजपा राष्ट्रीय सहसंघटन सरचिटणीस शिवप्रकाश,समर्थ बूथ अभियान महाराष्ट्रचे प्रदेश संयोजक आ.रामदासजी आंबटकर,प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर,चंद्रपुर लोकसभा विस्तारक खुशाल  बोन्डे, भाजपा(ग्रा) महामंत्री संजय गजपुरे,नामदेव डाहूले यांची उपस्थिती होती.

भाजपा तर्फे सद्या संघटनात्मक विषयांवर पक्ष नेतृत्वाने लक्ष केंद्रित केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुबंई येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी,उत्तन भाईंदर येथे 15 व 16 जुलैला समर्थ बूथ अभियानाचे प्रशिक्षण, जिल्हा संयोजकांना दिले गेले.बूथ रचनेचे महत्व,या कार्यात येणाऱ्या अडचणी व योग्य नियोजन यावर पक्षप्रमुखांनी मार्गदर्शन केल्यावर प्रत्येक जिल्ह्याचा अहवाल बघतांना  चंद्रपूरचा ही अहवाल बघितला.चंद्रपूर महानगर येथील 17 प्रभागातील  300 बूथ,70 शक्तिकेंद्र प्रमुख पक्षाच्या सुचने प्रमाणे तयार करण्यात आल्याची माहिती पुस्तीका बघून पक्षश्रेष्ठींनी कौतूक केले.

हे अभियान यशस्वी करण्यात माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर,जेष्ठनेते प्रमोद कडू, जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे,महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे,संघटन महामंत्री राजेंद्र गांधी,महामंत्री सुभाष कासंगोट्टूवार,रवींद्र गुरनुले,कोषाध्यक्ष प्रकाश धारणे,महापौर राखी कंचर्लावार,उपमहापौर राहुल पावडे,भाजपा मंडळ प्रमुख रवी लोणकर,संदीप आगलावे,विठ्ठलराव डुकरे,सचिन कोतपल्लीवार, दिनकर सोमलकर,महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अंजली घोटेकर,भाजयुमो जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर यांनी मोलाचे सहकार्य केले,अशी माहिती यावेळी प्रदेशाध्यक्ष पाटील यांना पाझारे यांनी दिली.यावेळी पक्षश्रेष्ठींनी,या अभियानाचे सूक्ष्म नियोजन करावे,पेज प्रमुख निवडतांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले.