महाराष्ट्रातील "या" जिल्ह्यात डेल्टा प्लसचे रुग्ण, या जिल्ह्यात 358 गावात कंटेन्मेंट झोन #Maharashtra #DeltaPlusVarient #कंटेमेंटझोन

महाराष्ट्रातील "या" जिल्ह्यात डेल्टा प्लसचे रुग्ण, 

या जिल्ह्यात 358 गावात कंटेन्मेंट झोन

रत्नागिरी, 11 ऑगस्ट: महाराष्ट्रात कोरोना विषाणू संसर्गाची लाट आटोक्यात येत असल्याचं चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्ण संख्या 10 हजारांच्या खाली आहे. राज्य सरकारनं कोरोना विषाणू संसर्ग अधिक असलेले जिल्हे वगळता इतर ठिकाणचे निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. मात्र, राज्यातील काही ठिकाणी डेल्टा प्लस वेरिएंटचे रुग्ण आढळल्यानं प्रशासनाची चिंता वाढली आहे. निर्बंध शिथील न केलेल्या जिल्ह्यांमध्ये रत्नागिरीचा देखील समावेश आहे. त्यातचं जिल्ह्यात डेल्टाचे रुग्ण आढळल्यानं प्रशासन ॲलर्ट झालं आहे.

➡️ रत्नागिरी जिल्ह्यात 358 गावात कंटेन्मेंट झोन
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुका डेल्टा व्हेरिएंटचा हॉटस्पॉट ठरतोय. त्यामुळे आता जिल्हा आरोग्य यंत्रणा हाय अ‌ॅलर्टवर झालीय. रत्नागिरी जिल्ह्यात एकाच वेळी 20 पेक्षा जास्त रुग्ण सापडलेल्या गावांमध्ये कंन्टेंटमेंट झोन करण्यात आली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील 358 गावांमध्ये सध्या कन्टेंटमेंट झोन करण्यात आलेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात डेल्टा वेरिएंटचे रुग्ण सापडलेल्या संगमेश्वरमधील एका वाडीत कडक कंन्टेंटमेंट झोन करण्यात आल्याची माहिची जिल्हा शल्यचिकित्सक संगमित्रा फुले यांनी दिलीय. या गावांमध्ये 100 टक्के लसीकरण आणि टेंस्टिंग करण्याचे प्रयत्न सुरु आहेत, असं देखील त्यांनी सांगितलंय.

कोरोनाची दुसरी लाट किंवा दुसऱ्या लाटेतील कोरोना रूग्णांची संख्या कमी होत असताना रत्नागिरीत जिल्ह्यात दोन नव्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रूग्ण आढळून आले आहेत. दोन्ही रूग्ण हे संगमेश्वर तालुक्यातील असून त्यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे जिल्हावासियांना काळजी करण्याचं कारण नाही. जवळपास महिनाभरापूर्वी या दोन रूग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याचा रिपोर्ट 9 ऑगस्टला प्राप्त झाला होता.

महाराष्ट्र राज्यात डेल्टा प्लस रुग्णांची वाढ झालीय. राज्यातील रत्नागिरी, जळगाव, पुणे, ठाणे मुंबई बरोबरच बीड आणि औरंगाबाद मध्ये देखील डेल्टाचा वेरियंट आढळल्याची माहिती त्यांनी दिली होती. दरम्यान, यामुळे घाबरून न जाण्याचा सल्ला देखील राजेश टोपे यांनी दिला होता.