चंद्रपूर महापालिकेत कोंबड्या सोडल्या , राष्ट्रवादी चे अधिकाऱ्यांना जागे करण्या करिता धिक्कार आंदोलन CMC Chandrapur rashtravadi

 चंद्रपूर महापालिकेत कोंबड्या सोडल्या
  
राष्ट्रवादी चे अधिकाऱ्यांना जागे करण्या करिता धिक्कार आंदोलन 

चंद्रपुर : चंद्रपूर शहरातील जनतेला शुद्ध आणि मुबलक पाणी मिळावे ह्या करिता अमृतजल योजने अंतर्गत कंत्राटदाराला 2015 मध्ये 354 कोटी रुपयांचा कंत्राट देण्यात आला परंतु आज 5 वर्ष लोटून गेले तरी आजपर्यंत ह्या योजनेच्या कंत्राटदाराने काम तर पूर्ण केले नाही आणि जे काम केले ते पण पूर्ण पणे निकृष्ट दर्जाचे काम केले.

चंद्रपूर शहरा मध्ये पाईप लाईन टाकलेल्या भागात जे गट्टू लावण्यात आले ते गट्टू पूर्ण पणे जमिनीच्या आत गेले ह्याचाच अर्थ काम एकदम निकृष्ट दर्जाचे झाले.
ह्या विषयाला घेऊन वारंवार प्रत्येक झोन मध्ये नागरिकांच्या प्रश्नाला घेऊन निवेदन देण्यात आले परंतु मनपा चंद्रपूर ने दुर्लक्ष केले  म्हणून ह्या विषयाला घेऊन आज दिनांक 12/8/2021 ला अमृत जल योजनेच्या भोंगळ कारभार आणि ह्या भोंगळ कारभार बघून अधिकारी दुर्लक्ष करीत असलेल्या मुळे आज महापालिका चंद्रपूर येथे कंत्राटदारावर चौकशी लावावी ह्या करिता धिक्कार आंदोलन करण्यात आले आणि अधिकाऱ्यांना जागे करण्या साठी महापालिकेत कोंबड्या सोडण्यात आले सदर आंदोलन राष्ट्रवादी युवक चंद्रपूर चे जिल्हा सचिव अभिनव देशपांडे ह्यांच्या नेतृत्वात घेण्यात आले.
धिक्कार आंदोलन मध्ये चंद्रपूर शहर जिल्हा अध्यक्ष राजीव कक्कड, विधानसभा अध्यक्ष सुनील काळे,महिला कार्याध्यक्ष सौ चारुशीला बारसागडे,युवती कार्याध्यक्ष अश्विनी तालापल्लीवार,युवती विधानसभा अध्यक्ष  वैष्णवी देवतळे, उपाध्यक्ष निसार शेख, चेतन धोपटे,विनोद लभाने ,नौशाद सिद्दिकी, शहर सचिव नयन साखरे, संभाजी खेवले,अब्दुल जमील,मनोज खंडेलवाल, शालीक भोयर,दीपक गोरडवार, प्रवीण जुमडे,राम इंगळे, सौ पूजा शेरकी  आकाश निरटवार, शुभम मुखर्जी,शुभम बाराहाते, स्वप्नील सातपुते,केतन जोरगेवार,विपील लभाने,कोमिल मडावी, राहुल आवळे,पीयूष भोगेकर, प्रेम परचाके, सुरज भेले, टीमुत्ती बंडावार,नदीम शेख विशाल राऊत,मंगेश खंडले,स्वप्नील गेडाम,हर्षल कांबळे,असीम शेख,धीरज दुर्योधन,आदिल खान,गौरव भोयर अमोल मोरे,आशिष चापले, धीरज बॅग्सरे,आकाश गायकवाड,चेतन अनंतवार, प्रणय पोतराजे, राहुल देशकर,शाम चिलकेवार,विजय राऊत,संदीप गुलशेट्टीवार,प्रलय मशाखात्री,कपिल उईके,समीर शेख,तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
अमृतजल योजनेच्या कामावर व अधिकाऱ्यांवर चौकशी नेमून कार्यवाही न केल्यास या पेक्षाही उग्र आंदोलन घेण्यात येईल असा इशारा ह्या वेळेस राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सचिव  अभिनव देशपांडे ह्यांनी आंदोलन वेळेस सांगितले,