स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं महत्वाचं वक्तव्य #DeputyCMAjitPawar

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं महत्वाचं वक्तव्य

#Loktantrakiawaaz
#ElectionNews
मुंबई, 21 ऑगस्ट : महाराष्ट्र राज्यातील महत्वाच्या महापालिका आणि नगर परिषद निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केल्याचं पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीच्या (MVA) रुपात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र असले तरी स्थानिक पातळीवर हे पक्ष स्वतंत्र लढण्याचीच शक्यता अधिक आहे. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) यांनी महत्वाचं वक्तव्य केलंय. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याची मुभा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेबाबत त्या त्या जिल्ह्यात अधिकारी देणार असल्याचं अजित पवार म्हणाले. 

प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याची मुभा आहे. सद्यस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना (Congress, NCP, Shivsena) एकत्र सरकार चालवत आहेतत. महाराष्ट्र राज्य स्तरावरच्या आणि इतर महत्वाच्या निवडणुका लढवण्याबाबत वरिष्ठ पातळीवरचे नेते निर्णय घेतात. स्थानिक स्वराज्य संस्थेबाबत त्या त्या जिल्हात अधिकार देणार. याबाबत उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, छगन भुजबळ आम्ही सर्वजण बैठक घेऊन निवडणुकाबाबत दिशा ठरवू, असं अजित पवार म्हणाले.