स्थानिक जटपुरा गेट सराय मार्केट येथून कचरा संकलन केंद्र हटविण्यासाठी आम आदमी पार्टी ने केले जनआंदोलन Jatpura Gate Sarai Market Kachara

स्थानिक जटपुरा गेट सराय मार्केट येथून कचरा संकलन केंद्र हटविण्यासाठी आम आदमी पार्टी ने केले जनआंदोलन 
#Loktantrakiawaaz
चंद्रपूर, 02 अगस्त : आम आदमी पार्टी चे विधानसभा प्रमुख तथा जिल्हा उपाध्यक्ष हिमायु अली यांचे नेतृत्वात जिल्हाध्यक्ष सुनील देवराव मुसळे यांचे मार्गदर्शनात सराई मार्केट जटपुरा गेट ईथून कचरा संकलन केंद्र हटविण्यासाठी जन आंदोलन करण्यात आले.आम आदमी पार्टीच्या शिष्टमंडळाने जिल्हा अधिकारी मार्फत विभागीय आयुक्तांना निवेदन पाठविले .
चंद्रपूर शहर मनपा चंद्रपूर शहर चा कचरा सराय मार्केट येथे जमा करून पुन्हा तिथून दुसरीकडे हलविला जातो त्यामुळे दिवसभर कचरा जमा असल्यामुळे दुर्गंधी येत असते व आजूबाजूच्या परिसरातील जनतेला व व्यापाऱ्यांना बिमारी चा त्रास होत असतो .याची तक्रार आम आदमी पार्टीने मनपा आयुक्ताकडे दिनांक 26/ 7/ 21 रोजी केली. सात दिवसाच्या आत कचरा संकलन केंद्र हटविण्याबाबत मागणी करण्यात आली .आयुक्ताने लवकरात लवकर कार्यवाही करू असे सांगितले परंतु सात दिवस लोटून सुद्धा  चंद्रपूर मनपाचे आयुक्त कडून कुठलेही कार्यवाही न केल्यामुळे आज हे जन आंदोलन करण्यात आले. येत्या काही दिवसात तोडगा न निघाल्यास पुन्हा जनतेला सोबत घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे यांनी केला.आंदोलनात जिल्हाध्यक्ष- सुनील मुसळे, जिल्हा संघटन मंत्री- राजेश बेले, जिल्हा उपाध्यक्ष; हीमायु अली, जिल्हा सचिव- संतोष दोरखंडे, जिल्हा युवा अध्यक्ष- मयूर राईकवार,जिल्हा कोषाध्यक्ष- भिवराज सोनी, बल्लारपूर शहराध्यक्ष-रवी पप्पुलवार, संजीव खोबरागडे, सिकंदर सागोरे, अमित बोरकर, योगेश आपटे , सुनील भोयर, अफजल अली, बबन कृष्णपल्लीवार ,दिलीप तेलंग समशेर सिंग ,अजय डुकरे तसेच अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.