ब्रेव्हे (BRM) मध्ये सहभागी झाले चंद्रपूरचे १६ सायकलपटू #Chandrapur #16CycleRacer

ब्रेव्हे (BRM) मध्ये सहभागी झाले चंद्रपूरचे १६ सायकलपटू
#Loktantrakiawaaz
#SportsNews
चंद्रपूर, 13 सेप्टेंबर : लांब पल्याच्या सायकलिंगकरीता ऑडेक्स पॅरिस या संस्थेच्या राँदेनिअरींग उपक्रमाला १०० वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल नागपूर राँदेनिअर्स या सायकलपटूंच्या क्लबच्या वतीने, १२ सप्टेंबर रविवार ला २०० किलोमीटरच्या ब्रेव्हे चे आयोजन करण्यात आले होते. प्रथमच या उपक्रमात २२५ सायकलपटू सहभागी झाले. इतक्या मोठ्या प्रमाणात सायकलपटू सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ होती. यात चंद्रपुर चे १६ सायकलपटू डॉ. आशिष गजबे, डॉ. सचिन भेदे, मोहम्मद कांचवाला, अनिल टहलीयानी, बंटी बोधवानी, इरफान रीयानी, कुलदीप(गोलू )कपूर, मनिश मुलचंदानी, राकेश उधवानी, अब्दुल आबीद, शाकीर उकाणी, संभाजी बडगुजर, पियुश कोटकर, डॉ. प्राजक्ता असवार, डॉ. कल्पना गुलवाडे, डॉ. संदीप मुनगंटीवार यांनी २०० किलोमिटर सायकल चालवली. ब्रेव्हे पिपलपाणी मार्गे पांदुर्णापर्यंत जावून सायकलपटूंना सायंकाळी ७ वाजेपर्यंत परत येणे अनिवार्य होते.यंदाच्या ब्रेव्हेमध्ये आतापर्यंतचा सर्वाधिक सहभाग झाला यामध्ये नागपूरसह, चंद्रपूर, भोपाळ, जळगाव, जबलपूर, अमरावती, अकोला आणि वाशीम याठिकाणचे सायकलपटू सहभागी झाले. यामध्ये १२ महिला सायकलपटूंचा समावेश आहे.