देशाच्या विकासात इंदिराजींचा मोठा वाटा, पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन, चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसतर्फे अभिवादन कार्यक्रम Chandrapur City Congress Ex PM Indira Gandhi

देशाच्या विकासात इंदिराजींचा मोठा वाटा

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन
 
चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसतर्फे अभिवादन कार्यक्रम 

#Loktantrakiawaaz
चंद्रपूर, 31 ऑक्टोबर : देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी (EX PM Indira Gandhi) यांनी समाजातील सर्वच घटकांना न्याय देण्यासाठी पुढाकार घेतला. तसेच देशाची सर्व आघाड्यांवर प्रगती व्हावी म्हणून अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यामुळेच त्यांना आयर्न लेडी म्हणून ओळखले जाते. देशाच्या विकासात इंदिरा गांधी यांचे मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री विजय वडेट्टीवार (Chandrapur District Gurdian Minister Vijay Wadettiwar) यांनी केले. 
चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या (Chandrapur City District Congress) वतीने शुक्रवारी (ता. ३१ ऑक्टोबर ) सकाळी ९.३० वाजता माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी (Ex PM Indira Gandhi) यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री विजय वडेट्टीवार बोलत होते.

 चंद्रपुर शहरातील (Chandrapur City) प्रियदर्शिनी इंदिरा गांधी चौक परिसरातील इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, महिला काँग्रेसच्या  ग्रामीण जिल्हाध्यक्ष चित्रा डांगे, शहर जिल्हाध्यक्ष सुनीता अग्रवाल, मनपाचे गटनेता डॉ. सुरेश महाकुलकर, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संदीप गड्डमवार, कामगार नेते के. के. सिंग, उमाकांत धांडे, राजेश अडूर, कुणाल चहारे, भालचंद्र दानव, नरेंद्र बोबडे, प्रसन्ना शिरवार, पप्पू सिद्दीकी, मोनू रामटेके, प्रवीण माहूरकर, रवी रेड्डी, स्वाती त्रिवेदी यांच्यासह काँग्रेसच्या सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.