06 डिसेम्बर महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर कोणताही जाहीर कार्यक्रम घेण्यास मनाई, महाराष्ट्र शासनाची नवी नियमावली जाहीर Mahaparinirvan Din Chaitanya Bhumi

06 डिसेम्बर महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर कोणताही जाहीर कार्यक्रम घेण्यास मनाई, 

महाराष्ट्र शासनाची नवी नियमावली जाहीर

#Loktantrakiawaaz
मुंबई, 30 नवंबर : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर (Bharatratna Dr Babasaheb Ambedkar) यांच्या महापरिनिर्माण (Mahaparinirvan Din) दिनानिमित्त येत्या 6 डिसेंबर (06 December) रोजी मुंबईतल्या चैत्यभूमीवर (Mumbai Chaitanya Bhumi) कोणताही जाहीर कार्यक्रम आयोजित करण्यास राज्य शासनाने मज्जाव केला आहे. कोरोना (Covid-19) प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला आहे. सभा, संमेलन, मोर्चा काढण्यासदेखील महाराष्ट्र शासनाने मनाई केली आहे. या वर्षीचा महापरिनिर्माण दिन अनुयायांनी अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

महाराष्ट्र  सरकारने 6 डिसेंबर रोजीच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार, दादर येथील चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क (Dadar, Shivaji Park, Chaitanya Bhumi) परिसरात कोणतेही स्टॉल लावण्यात येणार नाहीत, असे जाहीर केले आहे. अनुयायांनी घरूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करावे, असेही आवाहन राज्य शासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

💉 मान्यवरांनाही कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक
महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या सूचनांमध्ये महत्त्वाची माहिती म्हणजे, चैत्यभूमीवर आदरांजली वाहण्यासाठी येणाऱ्या मान्यवरांनीही कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक आहे. लस प्रमाणपत्र नसेल तर अशा मान्यवरांना या परिसरात प्रवेश करण्यास मनाई केली जाईल. ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पॉर्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला आहे. यंदा मात्र चैत्यभूमीवर किंवा शिवाजी पार्कवर या दिवशी कोणताही कार्यक्रम होणार नाही, असे शासनाने जाहीर केले आहे. अनुयायांनी घरी राहूनच श्रद्धांजली अर्पण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.