Today 27 NOVEMBER: चंद्रपुर जिल्हा कोरोना अपडेट Chandrapur Corona Update

Today 27 NOVEMBER: चंद्रपुर जिल्हा कोरोना अपडेट

✳️ 00 कोरोना वर मात

✳️ 04 नवीन पॉजिटिव

✳️ 00 बाधितन्चा कोरोना ने मृत्यु

#Loktantrakiawaaz
#Chandrapur-Corona-News

चंद्रपूर, दि. 27 नोव्हेंबर : गत 24 तासात जिल्ह्यात 4 जण नव्याने बाधित झाले आहेत. तर ॲक्टीव्ह रुग्ण 14 आहेत. जिल्ह्यात शनिवारी एकाही बाधिताचा  मृत्यू  झाला नाही.
आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात 3 तर वरोरा येथे 1 रुग्ण आढळला असून चंद्रपूर, बल्लारपूर,  भद्रावती, ब्रम्हपुरी, नागभीड, सिंदेवाही, मुल, सावली, पोंभूर्णा, गोंडपिपरी, राजूरा, चिमूर, कोरपना, जिवती व इतर  ठिकाणी बाधित रुगांची संख्या शून्य आहे.

चंद्रपुर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 88 हजार 850 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 87 हजार 293 झाली आहे. सध्या 14 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 7 लाख 60  हजार 657 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 6 लाख 70 हजार 366 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1543 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.