महाराष्ट्र शासने वाढत्या इंधनदरवाढीला आळा घालण्यासोबत पर्यावरणपूरक वाहन निर्मितीला चालना देण्यासाठी इलेक्ट्रिक वाहन धोरण आणले, प्रत्येक किलोमीटरमागे केवळ पन्नास पैसे खर्च येणार #GovernmentofMaharashtra #IntroducesElectricVehiclePolicy #RisingFuelPrices #PromoteEco-FriendlyVehicleManufacturing

महाराष्ट्र शासने वाढत्या इंधनदरवाढीला आळा घालण्यासोबत पर्यावरणपूरक वाहन निर्मितीला चालना देण्यासाठी  इलेक्ट्रिक वाहन धोरण आणले

प्रत्येक किलोमीटरमागे केवळ पन्नास पैसे खर्च येणार

#Loktantrakiawaaz
मुंबई, 17 डिसम्बर: वाढत्या इंधनदरवाढीला आळा घालण्यासोबत पर्यावरणपूरक वाहन निर्मितीला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने इलेक्ट्रिक वाहन धोरण आणले. 
(Government of Maharashtra Introduces Electric Vehicle Policy To Curb RIsing Fuel Prices And Promote Eco-Friendly Vehicle Manufacturing).

त्यानुसार राज्यात २०३० पर्यंत बहुतांश वाहने इलेक्ट्रिक वाहने असतील. इलेक्ट्रिक वाहन उत्पादक आणि ग्राहकांना अनुदान देण्याची नव्या धोरणात तरतूद आहे. या धोरणास विविध ऑटोमोबाईल कंपन्यांकडून प्रतिसाद लाभत आहे. (Automobile Company). त्याच अनुषंगाने महिंद्रा कंपनीने ट्रिओ नावाची इलेक्ट्रिक रिक्षा बाजारात आणली आहे.(Electric Rikshaw). तिचे आज अनावरण केले. 
ट्रिओ रिक्षाची किंमत दोन लाख रुपये इतकी असेल. प्रत्येक किलोमीटरमागे केवळ पन्नास पैसे खर्च येणार आहे. (Fifty Paise Per Km).
दरम्यान, मुंबई (Mumbai Area) परिसरात मोठ्या प्रमाणात ऑटो रिक्षा चालविल्या जातात. येत्या काळात मुंबईच्या रस्त्यावर या इलेक्ट्रिक रिक्षा धावतील. यासाठी रिक्षा संघटना पुढाकार घेईल. कंपनीने देखील यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून द्यावे.