महाराष्ट्रात ओमिक्रॉनचा धोका वाढला, महाराष्ट्रातील निवडणुकाही बारगळणार? एका चर्चे दरम्यान विधानसभेत हे विधान #MaharashtraElection #OmicronincreasedinMaharashtra, #ElectionsinMaharashtraalsofail? #LegislativeAssembly #Discussion

महाराष्ट्रात ओमिक्रॉनचा धोका वाढला, महाराष्ट्रातील निवडणुकाही बारगळणार?

एका चर्चे दरम्यान विधानसभेत हे विधान

#Loktantrakiawaaz
मुंबई, 24 डिसम्बर : कोरोनाचं(Covid-19) संकट वाढत असून ओमिक्रॉनचाही (Omicron) फैलाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इलाहाबाद हायकोर्टाने (Elahabad High Court) थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनाच उत्तर प्रदेश विधानसभेच्या ( Uttar Pradesh Assembly Election) आगामी वर्षी होणाऱ्या निवडणुका पुढे ढकलण्याचे आवाहन केलं आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील निवडणुका पुढे जाण्याची शक्यता असतानाच राज्यातील महापालिका, नगरपरिषदा आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकाही पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे. आज विधानसभेतही त्याबाबतची चर्चा झाली. शिवसेनेचे नेते सुनील प्रभू (Shivsena Leader Sunil Prabhu)यांनी तर उत्तर प्रदेशातील निवडणुका पुढे ढकलण्याची सूचना कोर्टाने पंतप्रधानांना केली आहे. निवडणूक आयोगाने तसा निर्णय घेतला तर महाराष्ट्रातही निवडणूक आयोगाला (Maharashtra Election Commission) असाच निर्णय घ्यावा लागेल असं म्हटलं आहे. त्यामुळे राज्यातही निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.
(The Omicron has increased in Maharashtra, will the elections in Maharashtra also fail?
This statement in the Legislative Assembly during a discussion)

सुनील प्रभू यांनी एका चर्चे दरम्यान विधानसभेत हे विधान केलं. ओमिक्रॉनचे रुग्ण उत्तर प्रदेशात वाढत आहेत. त्यामुळे राज्यातील निवडणुका पुढे ढकलल्या जाव्यात अशी सूचना इलाहाबाद कोर्टाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे. ही परिस्थिती पाहून निवडणूक आयोगाला निर्णय घ्यावा लागणार आहे. निवडणूक पुढे ढकला जाऊ शकते का याबाबत भविष्य मी करणार नाही, करू शकत नाही. पण महाराष्ट्रातही ओमिक्रॉनचे रुग्ण वाढले तर निवडणूक आयोगाला समान निर्णय घ्यावा लागेल, असं प्रभू यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राज्यातील निवडणुका पुढे ढकलल्या जाणार असल्याची चर्चा आहे.

महाराष्ट्र राज्यात मुंबई, ठाणे आणि पुणे महापालिकेसह 22 महापालिकांची (Municipal Corporation Election) निवडणूक होणार आहेत. त्याशिवाय ग्रामपंचायती आणि नगर परिषदांच्याही (Gram Panchayat, Nagar Parishad Election) निवडणुका होऊ घातल्या आहेत. मात्र, देशावर कोरोना आणि ओमिक्रॉनचं संकट वाढल्याने या निवडणुकाही पुढे ढकलल्या जातात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.