चंद्रपुर येथे 'महिला आयोग आपल्या दारी' उपक्रमाचे आयोजन, महिलांच्या तक्रारीबाबत स्थानिक स्तरावर समस्या मांडण्यासाठी Maharashtra State Commission For Women

❇️ महिलांच्या तक्रारीबाबत स्थानिक स्तरावर समस्या मांडण्यासाठी

❇️ चंद्रपुर येथे 'महिला आयोग आपल्या दारी' उपक्रमाचे आयोजन

❇️ महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत होणार जनसुनावणी

#Loktantrakiawaaz
चंद्रपूर दि. 3 डिसेंबर:  महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे कार्यालय, मुंबई येथे (Maharashtra State Commission For Women, Mumbai) असल्याने जिल्ह्यातील अनेक महिलांना मुंबई येथे पोहोचणे शक्य होत नाही. महिलांना त्यांच्या तक्रारीबाबत स्थानिक स्तरावर आपले म्हणणे मांडण्याकरिता 'महीला आयोग आपल्या दारी' या उपक्रमाद्वारे दि. 9 डिसेंबर  2021 रोजी दुपारी 12 वाजता  नियोजन भवन, चंद्रपूर येथे जिल्ह्यातील महिलांच्या तक्रारीवर जनसुनावणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. (Niyojan Bhawan, Chandrapur)

या जनसुनावणीस महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (President Rupali Chakanakar) उपस्थित राहणार आहेत. जनसुनावणीत तक्रारदार पीडित महिलेला स्थानिक पातळीवर तात्काळ मदत व्हावी, कोणतीही पीडित महिला कोणतीही पूर्वसूचना न देता थेट सुनावणीस उपस्थित राहून आपली समस्या लेखी स्वरूपात आयोगापुढे मांडू शकेल. तरी जिल्ह्यातील पीडित महिलांनी या जनसुनावणीचा लाभ घ्यावा, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी कळविले आहे.