चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील आयटीआय उत्तीर्ण शिकाऊ उमेदवारांकरीता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत भरती मेळाव्याचे आयोजन #OrganizingRecruitmentMeet #GovernmentIndustrialTrainingInstitute #ITIPassedApprentices #ChandrapurandGadchiroliDistricts

चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील आयटीआय उत्तीर्ण शिकाऊ उमेदवारांकरीता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत भरती मेळाव्याचे आयोजन

#Loktantrakiawaaz
चंद्रपूर दि. 18 डिसेंबर: चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील आय.टी.आय उत्तीर्ण उमेदवारांकरीता दोन दिवसीय रोजगार व शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,चंद्रपुर येथे दि.21 व 22 डिसेंबर 2021 रोजी  सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आले आहे. या भरती मेळाव्यामध्ये नामांकित कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित असणार आहे.
(Organizing Recruitment Meet at Government Industrial Training Institute for ITI Passed Apprentices in Chandrapur and Gadchiroli Districts)

फिटर, डिझेल मेकॅनिक, मोटर मेकॅनिक,टर्नर, मशिनिस्ट, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, टूल अँड डाय मेकर, प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर, ट्रॅक्टर मेकॅनिक, सिओई ऑटोमोबाईल, पेंटर, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, कार्पेंटर, शीट मेटल वर्कर आदी ट्रेड व्यवसायातील उमेदवारांसाठी नामांकित कंपन्यांमध्ये रोजगार तथा शिकाऊ उमेदवारीसाठी जागा उपलब्ध आहेत.

या भरती मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी आधार कार्ड, पॅन कार्ड, संबंधित ट्रेड प्रमाणपत्र तथा शालेय प्रमाणपत्रासह  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या कौशल्यम सभागृहात दि.21 व 22 डिसेंबर 2021 रोजी  सकाळी 10 वाजता उपस्थित रहावे. असे आवाहन सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार श्रीमती प्र.ही. दहाटे यांनी केले आहे.