आरटीओ कार्यालयाच्या बदनामीला अधिकारी जबाबदार, शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांचा आरोप, अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची निवेदनातून केली मागणी #RTOCHANDRAPUR #CONGRESS #RAMUTIWARI

आरटीओ कार्यालयाच्या बदनामीला अधिकारी जबाबदार

शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांचा आरोप

अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची निवेदनातून केली मागणी

#Loktantrakiawaaz
चंद्रपुर, 22 डिसम्बर: चंद्रपूर येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय (Dy Regional Transport Officer, Chandrapur) आणि वाद ही बाब चंद्रपूरकरांसाठी नवीन नाही. त्यासाठी तेथील अधिकाऱ्यांची कार्यप्रणालीसुद्धा तेवढीच कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे शहरातील काही बहाद्दर खंडणीसाठी या कार्यालयाची निवड करीत असल्याचे आजपर्यंत समोर आलेल्या अनेक घटनांतून दिसून येते. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे संबंधित कार्यालय आणि पर्यायाने राज्य शासन बदनाम होत आहे. त्यामुळे येथील अधिकाऱ्यांच्या कारभाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी केली आहे.(Congress Chandrapur City District President Ritesh (Ramu) Tiwari).

चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा आहे. (Chandrapur Industrial District). छोटे-मोठे असे शेकडो उद्योग येथे आहेत. कच्चा-पक्का मालाची आयात-निर्यात जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात होत असते. त्यामुळे जिल्ह्यातून धावणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. त्यासोबतच या जिल्ह्याला तेलंगणा राज्याची सीमा लागून आहे. दुसऱ्या राज्यातील वाहनेही जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात धावत असतात. त्यामुळे येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचा कामाचा व्याप मोठा आहे.(RTO). लहान आणि मोठ्या वाहनांच्या कामासाठी शेकडोच्या संख्येने येणाऱ्या नागरिकांमुळे हे कार्यालय नेहमीच गजबजलेले असते. नियमानुसार काम करणाऱ्यांना अनेक हेलपाटे मारावे लागतात. मात्र, तेच काम दलालामार्फत केल्यास काही तासांत पूर्ण होते, असा येथे येणारे नागरिक आपला अनुभव सांगत असतात. त्यामुळे येथील दलाल आणि अधिकाऱ्यांची मैत्री लपून राहिलेली नाही. 

या कार्यालयाअंतर्गत सुरू असलेल्या जिल्ह्यातील चेकपोस्टवरून वाहनचालकांकडून मोठी लूट सुरू आहे. मात्र, पाण्यात राहून मगरीशी वैर नको, या भावनेतून कुणीही उघडपणे तक्रार करायला समोर येत नाही. परंतु, येथील अधिकाऱ्यांच्या त्रासामुळे अनेकजण त्रस्त आहेत. विशेष म्हणजे, ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकांकडून वसुली करण्यासाठी एक अधिकारी नियुक्त करण्यात आला असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. मोरे येथे रुजू झाल्यानंतर या कार्यालयात मोठ्या प्रमाणात भोंगळ कारभार वाढला आहे. या कार्यालयाअंतर्गत कोणतीही मंजुरी न घेता खासगी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. 

या कार्यालयातील भोंगळ कारभारामुळेच काही बहाद्दर येथे खंडणीसाठी येत असतात. खंडणी मागणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. मात्र, येथील अधिकाऱ्यांनीसुद्धा कार्यालयाची मलिन झालेली प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. त्यामुळे या कार्यालयात कार्यरत अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी करण्यात यावी. जेणेकरून अधिकाराचा गैरवापर करीत लाखोची माया जमवित कार्यालयाची प्रतिमा धुळीस मिळविणाऱ्यांवर वचक बसण्यास मदत होईल, असेही श्री. तिवारी यांनी म्हटले आहे. याबाबतचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, परिवहनमंत्री, परिवहन आयुक्त, जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्ह्याचे खासदार यांना पाठविले आहे. (Chief Minister of Maharashtra, Dy CM Maharashtra, Transport Minister, Guardian Minister, Khasdar).