महाराष्ट्र बोर्ड परीक्षा : इयत्ता दहावी, बारावीच्या (SSC AND HSC EXAM ) परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, परीक्षा कधीपासून? वाचा सविस्तर Maharashtra Board

महाराष्ट्र बोर्ड परीक्षा : इयत्ता दहावी, बारावीच्या (SSC AND HSC EXAM ) परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, 

परीक्षा कधीपासून? वाचा सविस्तर

#Loktantrakiawaaz
मुंबई, 16 डिसम्बर : विद्यार्थ्यांसाठी ही सर्वात मोठी बातमी आहे. महाराष्ट्र  राज्यात दहावी, आणि बारावीच्या परीक्षांच्या (SSC AND HSC EXAMINATION) तारखा जाहीर झाल्या आहेत. 10वीची परीक्षा 15 मार्चे ते 18 एप्रिल दरम्यान होणार आहे, तर बारावीची परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान होणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड  (Education Minister Varsha Gayakwad) यांनी दिली आहे. दहावी, बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर कधी होणार? याची प्रतीक्षा दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना होती, त्या तारखा आज जाहीर झाल्या आहेत.

कोरोनामुळे (Covid-19) गेल्या दोन वर्षांपासून विद्यार्थी अनेक परीक्षांना मुकले होते. ओमिक्रॉनचा नवा व्हेरिएंट (Covid New Varient Omicron) आल्यानंतर यंदातरी परीक्षा होणार का? असा सवाल अनेक विद्यार्थ्यांना पडला होता. याबाब वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत, दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यात बारावीच्या परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल (4 March To 7 April) दरम्यान पार पडणार आहेत. तर त्यानंतर दहावीच्या परीक्षांना सुरूवात होणार आहे. दहवीच्या परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिल (15 March To 18 April) दरम्यान पार पडणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाला पुरेसा वेळ उपलब्ध होणार आहे.