चंद्रपुरतील या 15 परीक्षा उपकेंद्रांना सदर आदेश लागू
#Loktantrakiawaaz
चंद्रपूर, दि. 21 जानेवारी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा पूर्व परीक्षा-2021 ही चंद्रपूर मुख्यालयाच्या ठिकाणी दि.23 जानेवारी 2022 रोजी सकाळी 10 ते 12 व दुपारी 3 ते 5 या कालावधीत एकूण 15 उपकेंद्रावर आयोजित करण्यात आली आहे. सदर परीक्षा हि 15 परीक्षा उपकेंद्राच्या ठिकाणी सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत परीक्षा उपकेंद्राच्या 100 मीटर परिसरात प्रतिबंध लावण्यात येत आहे.
या परीक्षा उपकेंद्राच्या ठिकाणी 100 मीटर परिसरांतर्गत सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत परीक्षार्थी व्यतिरिक्त 2 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्रित जमा होणार नाही. परीक्षा उपकेंद्राच्या 100 मीटर परिसरांतर्गत, क्षेत्रांतर्गत सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत नियमित व रोजचे वाहतुकी व्यतिरिक्त इतर हालचालींना प्रतिबंध राहील. परीक्षा उपकेंद्राच्या 100 मीटर क्षेत्रांतर्गत परीक्षेदरम्यान झेरॉक्स, फॅक्स, एसटीडी बूथ, पेजर, मोबाईल फोन, इ-मेल, इंटरनेट सवलती किंवा इतर कोणत्याही कम्युनिकेशन सवलतींना प्रतिबंधक राहील.
विद्या विहार हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय तुकूम, भवानजीभाई चव्हाण हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय मुल रोड, सेंट मायकेल इंग्लिश स्कूल नगीनाबाग, लोकमान्य टिळक कन्या विद्यालय, नेहरू विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, लोकमान्य टिळक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, जनता महाविद्यालय सिव्हिल लाईन, मुरलीधर बागला कॉन्व्हेंट हायस्कूल बाबुपेठ, जुबली हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, मातोश्री माध्यमिक तथा उच्च माध्यमिक शाळा तुकुम, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, हिंदी सिटी उच्च माध्यमिक शाळा (आझाद गार्डन), सरदार पटेल महाविद्यालय गंजवार्ड, डॉ.आंबेडकर महाविद्यालय सिव्हिल लाईन तसेच श्री. साई पॉलिटेक्निक नागपूर रोड, चंद्रपूर या 15 परीक्षा उपकेंद्रांना सदर आदेश लागू राहील.
सदर आदेश हा चंद्रपूर मुख्यालयातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा पूर्व परीक्षा-2021 मधील परीक्षा उपकेंद्रावर दि. 23 जानेवारी 2022 चे सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत अंमलात राहील. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती व इसम प्रचलित कायद्यातील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. असे जिल्हा दंडाधिकारी अजय गुल्हाने यांनी निर्गमित केलेल्या आदेशात नमूद आहे.
(Maharashtra Public Service Commission)
(Pre-Exam-2021 Restrictions imposed within 100 meters of the examination sub-center)
(This order is applicable to these 15 examination sub-centers in Chandrapur)