Maharashtra Corona Guidelines New Update: निर्बंधांत शिथिलता आणण्यात आली

Maharashtra Corona Guidelines New Update:

निर्बंधांत शिथिलता आणण्यात आली

 महाराष्ट्रात ब्यूटी पार्लर आणि जिम 50 टक्के क्षमतेनं सुरू करण्यास परवानगी

#Loktantrakiawaaz
मुंबई, 09 जानेवारी: महाराष्ट्र राज्यात (Maharashtra) ब्यूटीपार्लर (Beauty Parlour) आणि जिम(Gym)वरील निर्बंधांत शिथिलता आणण्यात आलीय. जिम आण ब्यूटीपार्लर आता 50 टक्के क्षमतेनं सुरू केली जाणार आहेत. दोन डोस घेतलेल्यांनाच आता याठिकाणी परवानगी असणार आहे. त्यासोबतच मास्क(Mask)चा वापर बंधनकारक करण्यात आलाय. वाढत्या कोरोना (Corona) च्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं हा निर्णय घेतला आहे. नागरिकांनी सर्व नियमांचं पालन करावं, असं आवाहन करण्यात आलंय.