महाराष्ट्रात तूर्तास लॉकडाऊन नाही, पण निर्बंध कडक करण्याचा विचार, उप मुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत महत्त्वाचा निर्णय #Lockdown #Maharashtra ​​#TighteningRestriction #DeputyChiefMinisterAjitPawar

महाराष्ट्रात तूर्तास लॉकडाऊन नाही

पण निर्बंध कडक करण्याचा विचार

उप मुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत महत्त्वाचा निर्णय

#Loktantrakiawaaz
मुंबई, 05 जानेवारी : महाराष्ट्र राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी राज्यात तूर्तास लॉकडाऊन न लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, वाढती गर्दी आणि रुग्णसंख्या पाहता निर्बंध अधिक कडक करण्याचा विचार महाराष्ट्र राज्यसरकारने केला आहे.
(Maharashtra Corona)
(Lockdown)
(There is no lockdown in Maharashtra right now, But the idea of ​​tightening restrictions, Important decision in the presence of Deputy Chief Minister Ajit Pawar)

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Dy CM Ajit Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात तासभर बैठक पार पडली. या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे, (Health Minister Rajesh Tope) आरोग्य सचिव, वैद्यकीय शिक्षण सचिव आणि मुख्य सचिवही उपस्थित होते. यावेळी राज्यात कोणताही लॉकडाऊन न लावण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, नागरिकांनी गर्दी करू नये म्हणून निर्बंध अधिक कडक करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच कंटेन्मेट झोन वाढवणे, लसीकरण वेगाने करणे, रुग्णालयांची सज्जता आदींचा आढावा यावेळी घेण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. या बैठकीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहिती दिली जाणार आहे.

➡️ महाराष्ट्रात आज 75 ओमिक्रॉनबाधित
महाराष्ट्रात ओमिक्रॉन (Omicron Maharashtra) व्हेरियंटची लागण झालेले रुग्णही मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. राज्यात आज 75 ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील 40 रुग्ण हे एकट्या मुंबईतील (Mumbai Omicron) आहेत. आजच्या 75 रुग्णांसह राज्यातील ओमिक्रॉन रुग्णांची एकूण संख्या आता 653 वर पोहोचली आहे.