संपूर्ण महाराष्ट्रात कधी कुठे आणि कोणकोणत्या इयत्तांच्या शाळा सुरु आणि कोणत्या बंद? पाहुयात उद्यापासून नेमक्या कोणत्या जिल्ह्यातील शाळा उघडणार आहेत #Maharashtra #schoolsAreOpen #schools #open

संपूर्ण महाराष्ट्रात कधी कुठे आणि कोणकोणत्या इयत्तांच्या शाळा सुरु आणि कोणत्या बंद? 

पाहुयात उद्यापासून नेमक्या कोणत्या जिल्ह्यातील शाळा उघडणार आहेत ते

#Loktantrakiawaaz
मुंबई, 23 जानेवारी : हळूहळू महाराष्ट्र राज्यातील कोरोनाबाधितांची (Corona)  संख्या कमी होत असल्याने पुन्हा एकदा शाळा उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या आदेशानुसार उद्यापासून शाळा सरू (School Resumes) होत आहेत. मात्र जरी असे असले तरी देखील कोरोनाचा संभाव्य धोका पहाता शाळा सुरू करायची की नाही याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार हे जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्यामुळे काही जिल्ह्यात उद्यापासून शाळा सुरू होत आहेत. तर काही जिल्ह्यात अद्यापही शाळा सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. देशावर गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट आहे. कोरोनाकाळात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे (Lockdown) अनेक दिवस शाळा बंद (School Closed) होत्या. मागील काही दिवसांमध्ये कोरोना रुग्ण कमी झाल्याने शाळा उघडण्यात आल्या मात्र पुन्हा एकदा कोरोनाचा नवा व्हेरिएंट(New Varient Omicron) असलेल्या ओमिक्रॉनने धुमाकूळ घातल्याने शाळा बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला होता. 

➡️ पाहुयात उद्यापासून (24 जानेवारी) नेमक्या कोणत्या जिल्ह्यातील शाळा उघडणार आहेत ?

▪️मुंबई : 24 जानेवारी पासून शाळा सुरु होणार 1 ते 12 वी

▪️ठाणे : 24 जानेवारीला शाळा सुरु होणार 1 ते 12 वी

▪️नाशिक : 24 जानेवारीला शाळा सुरु होणार 1 ते 12 वी

▪️पुणे : शाळा सुरु करण्याचा निर्णय पुढच्या आठवड्यात होणार

▪️औरंगाबाद : फक्त  दहावी आणि बारावीच्या वर्ग उद्यापासून उघडणार

▪️कोल्हापूर : 25 जानेवारीला शाळा सुरु होणार 1 ते 12 वी

▪️नागपूर : 26  जानेवारी रोजी आढावा घेऊन त्यानंतर निर्णय

▪️सिंधुदुर्ग : शाळा सुरु करण्या संदर्भात 1 फेब्रुवारीला निर्णय

▪️जळगाव :  ग्रामीण भागातील शाळा सुरू होणार, शहरी भागातील तूर्तास बंद

▪️सांगली : 1 फेब्रुवारी पासून शाळा सुरु होणार 1 ते 12 वी

▪️चंद्रपूर : शाळा सुरु करण्या संदर्भात अजून निर्णय नाही

▪️रत्नागिरी : शाळा सुरु करण्यासंदर्भात 26 जानेवारी रोजी निर्णय

▪️रायगड : शाळा सुरु करण्यासंदर्भात उद्या जिल्हाधिकारी निर्णय घेणार

▪️पालघर : 8 ते 12 वी पर्यंतच्या शाळा 27 जानेवारी पासून सुरु होणार, इतर वर्ग बंद

▪️सोलापूर : शाळा सुरु करण्यासंदर्भात प्रशासनाचा अद्याप निर्णय नाही

▪️धुळे : 8 ते 12 पर्यत च्या शाळा 27 जानेवारीला सुरु होणार, तूर्तास प्राथमिक शाळा बंद

▪️नंदुरबार : 1 ते 4 थीच्या शाळा या ऑनलाइन सुरु राहणार, 5 ते 12 वी शाळा सुरू करण्याला परवानगी

▪️बुलढाणा : शाळा सुरु करण्यासंदर्भात शासनाचा तूर्तास निर्णय नाही

▪️अकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 1 ते 12  च्या शाळा उद्यापासून सुरु होणार, शहरी भागातील शाळा तूर्तास बंद

▪️वाशिम : जिल्ह्यात शाळा सुरु करण्यासंदर्भात 27 जानेवारी रोजी निर्णय होणार

▪️जालना : 24 जानेवारी पासून शहरी भागातील 8 ते  12 वी तर ग्रामीण भागातील 1 ते 12 वी शाळा सुरू होणार

▪️हिंगोली : जिल्ह्यातील शाळा सुरु करण्यासंदर्भात 27 जानेवारीला निर्णय होणार

▪️परभणी : उद्यापासून 9 ते 12 वी पर्यंतच्या शाळा सुरू होणार, 8 वी पर्यंतच्या शाळा बंदच

▪️अहमदनगर : शाळा सुरु करण्यासंदर्भात 25 जानेवारीला निर्णय होणार

▪️बीड : अद्याप निर्णय नाही, आज रात्री उशिरा निर्णय घेतला जाण्याची शक्यता

▪️उस्मानाबाद : 10 आणि 12 वीचे वर्ग सुरु आहेत, इतर वर्गांबाबत 29 जानेवारीला निर्णय

▪️सातारा : 1  ते 12 विच्या शाळा उद्यापासून संपूर्ण जिल्ह्यात सुरु होणार

▪️नांदेड : उद्यापासून जिल्ह्यात 9 ते 12 विच्या शाळा सुरु होणार पहिले ते आठवीच्या शाळा बंदच

▪️यवतमाळ : 27 जानेवारी पासून 9 ते 12 च्या शाळा सुरु होणार, पहिले ते आठवीच्या शाळा बंदच

▪️अमरावती : पुढील एक आठवडा शाळा बंदच

▪️वर्धा : संपूर्ण जिल्ह्यात 1 ते 12 वी च्या शाळा उद्यापासून सुरु होणार

▪️गोंदिया : शाळा सुरु करण्यासंदर्भात तूर्तास निर्णय नाही

▪️भंडारा : शाळा सुरु करण्यासंदर्भात तूर्तास निर्णय नाही

▪️लातूर : संपूर्ण जिल्ह्यात 1 ते 12 वी च्या शाळा उद्यापासून सुरु होणार

(When and where in the whole of Maharashtra which schools are open and which are closed?) (Let's see exactly which district's schools will open from tomorrow)

साभार- टीवी9